Devendra Fadnavis : शेतकऱ्यांचा काटा मारता..त्यांना दाखवतोच, अमित शहांसमोरच फडणवीसांचा कुणाला इशारा?

Devendra Fadnavis criticized sugar factory owners : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्या पाठीशी अमीत भाई शाह आहेत. त्यांनी काळजी करु नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ असं सांगितलं आहे.
Amit Shah-Devendra Fadnavis
Amit Shah-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे आज आहिल्यानगर दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला यावेळी अमित शहा यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी साखर कारखानदारांना आपल्या निशाण्यावर घेतलं.

साखर कारखान्यांनी नफ्यातून शेतकऱ्यांसाठी मदत निधी बाजूला काढण्यास नकार दिल्याने फडणवीसांनी कारखान्याच्या मालकांवर संयुक्तिक टीका केली. फडणवीस म्हणाले, सहकारी कारखान्यांचे खरे मालक तुम्ही नसून शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकार म्हणून आम्ही करु. शेतकऱ्यांसाठी जो निधी बाजूला काढा म्हणून सांगितलं होतं तो कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे. एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस केवळ एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी कारखाना मालकांचा आणखी समाचार घेतला. शेतकऱ्यांचा काटा मारून कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही असा हल्लाबोल करत थेट आरोपच फडणवीसांनी केला. तुम्ही शेतकऱ्यांच्या काटा मारून मारून पैसा जमा करता आणि त्याच शेतकऱ्यासाठी द्यायला तुमच्याकडे २५ लाख रुपये देण्याची दानत तुमच्यात नाही अशी टीका फडणवीसांनी केली.

Amit Shah-Devendra Fadnavis
Amit Shah : देवेंद्रजी, एकनाथ शिंदे और अजितदादा बनिया नही है; लेकीन बनियासे पक्के है : अमित शाह यांनी घेतली फिरकी

यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर देखील टीका केली. म्हणाले, मी काही लोकांना सांगतो की, तुम्ही एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही शेतकऱ्यांना किती मदत केली हे पाहा. त्यानंतर आमच्यावर टीका करा या भाषेत फडणवीसांनी फटकारलं. अहिल्यानगर मध्ये कधीही न बघितलेला पाऊस झालाय, आम्ही शेतकऱ्यांची मदत करतोय. शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठीच लोकांनी आम्हाला पाठवलंय खुर्च्या तोडण्यासाठी नाही. आम्ही शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.

Amit Shah-Devendra Fadnavis
Bachchu Kadu : बच्चू कडूंनी आमदार-खासदारांचा पगारच काढला, म्हणाले हे शेतकऱ्यापेक्षा गरीब..

आमचं सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी उभे आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. कालच अजित पवार मी आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळे एकत्र बसलो. शेतकऱ्याला जास्तीत जास्त व काय मदत करता येईल या संदर्भात आराखडा तयार केला जातो आहे. आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत. काळजी करू नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ असं त्यांनी सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com