Devendra Fadanvis | Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: ३३ नगरसेवक फोडणाऱ्या शिवसेना शिंदे पक्ष भाजपच्या मार्गात मोठा अडसर?

Eknath Shinde Group 33 Corporator Switch Becomes Major Hurdle for BJP : महायुतीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने अतिशय आक्रमकपणे नाशिक शहरात आपला विस्तार केला आहे.

Sampat Devgire

BJP Vs Shivsena News: सर्वोच्च न्यायालयाने येथे चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे इच्छुकांसह राजकीय पदाधिकारी आळस झटकून कामाला लागले आहेत. मध्ये सत्ताधारी महायुती पुढे राजकीय पेच आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीत महायुती एक संघपणे निवडणुकीला सामोरे जाणार अशी चर्चा आहे. दुसरीकडे कोणत्याही राजकीय चर्चेवर विसंबून न राहण्याचे धोरण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने स्वीकारले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर निवडणुकीची तयारी करीत आहे.

महायुती एकसंध पणे निवडणुकीला सामोरे गेल्यास भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून मोठा वाद होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्ष गेली पाच वर्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत होता. पक्षाचे शहरात ६५ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे जागा वाटपात मोठा वाटा भाजप घेणार आहे.

शिवसेना शिंदे पक्षाने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारत भाजपसह विविध पक्षांना फोडण्यासाठी प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय तंत्र पारंपारिक राजकारणाला छेद देणारे आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांना निवडणुकीआधीच विकास कामांसाठी निधी मिळाला आहे. त्यांनी आपल्या प्रभागात विविध कामे देखील केली. त्यामुळे निवडणुकीसाठी त्यांच्याकडे निधीची कमतरता नाही.

उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षाकडे सध्या ३३ माजी नगरसेवक आहेत. यामध्ये सर्वाधिक २८ नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आहेत. काँग्रेसचे दोन आणि मनसे व अपक्ष असे तीन नगरसेवक आहेत. नगरसेवकांना पक्षात प्रवेश देताना महापालिका निवडणुकीत शंभर टक्के उमेदवारी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

अशा राजकीय समीकरणांचा विचार केल्यास महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष किमान ५० हून अधिक जागांची मागणी करू शकतो. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षाचा संकोच होऊ शकतो. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षामुळे भाजपची कोंडी होण्याचे संकेत आहेत. महायुतीचे नेते त्यातून कसा मार्ग काढतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT