Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे पक्ष साशंक; पावसाळ्यात महापालिकेच्या निवडणुका कोणती यंत्रणा घेणार?

Eknath Shinde; Shiv Sena Eknath Shinde party leader Bunty Tidme has doubts about the municipal elections-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागले.
Eknath shinde & Bunty Tidme
Eknath shinde & Bunty TidmeSarkarnama
Published on
Updated on

Bunty Tidme News: सर्वोच्च न्यायालयाने २०२२ पूर्वी असलेले ओबीसी आरक्षण कायम ठेवून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यासंदर्भात चार महिन्यात तयारी पूर्ण करावी असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेते सक्रिय झाले आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने नाशिक शहरातील निवडणुकी संदर्भात नुकताच आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. निवडणुकांबाबत अनेक इच्छुक निवडणुकीच्या प्रतीक्षेत होते. या इच्छुकांच्या अशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

Eknath shinde & Bunty Tidme
Operation Sindoor: साधू खुष... म्हणाले, पुन्हा आगळीक केली तर भारत पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकवेल!

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. सध्या मे महिना सुरू आहे. सर्व शाळांना अवकाश जाहीर करण्यात आला आहे. पावसाळा येऊ घातला आहे. परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभरात कशा होणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

Eknath shinde & Bunty Tidme
Operation sindoor: छगन भुजबळ यांची सुचक प्रतिक्रीया, ... मात्र आपल्याला तयार रहावे लागेल!

या संदर्भात शिवसेना शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी निवडणुकीची तयारी गेले वर्षभर आमचा पक्ष करीत आहे. आजवरचा अनुभव पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास ऑक्टोबर महिना उजाडेल. या कालावधीत निवडणुका होत नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुका पुढे जाण्याची भीती श्री तिदमे यांनी व्यक्त केली.

राज्यातील मुंबईसह नाशिक आणि पुणे या महापालिकांची लोकनियुक्त प्रतिनिधींचा कालावधी संपुष्टात आला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून बहुतांशी महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. सकाळच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारकडूनच या संस्थांचा कारभार हकला जात आहे. पालकमंत्री यामध्ये थेट हस्तक्षेप करून कामकाज करतात.

या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीची सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांनी इच्छुक अन्न उत्सुकता आहे. मंत्री आणि राज्य सरकारला मात्र या निवडणुका जेवढ्या पुढे ढकलल्या जातील तेवढ्या फायद्याच्या वाटतात. त्यामुळे ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या या निवडणुका आता कधी होतील, याबाबत आत्मविश्वासपूर्वक कोणालाही तारीख सांगता येत नाही.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारकडून विशेषता भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून राज्यभर शिवसेना उद्धव ठाकरे आणि अन्नविरोधकांच्या नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधींना घाऊक पक्षांतरासाठी विविध आमिषे दाखविण्यात आली आहेत. त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी विस्कळीत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार केव्हा, हे अनिश्चित आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com