Shivsena Shinde News: मस्साजोगचे (बीड) सरपंच संतोष देशमुख हत्येचे पडसाद उमटतच आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने याबाबत आक्रमक होत आंदोलन केले आहे. विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्यावतीने संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानवी हत्येमुळे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. त्यांच्या समर्थकांनी मालेगाव शहरात आक्रमक होत आंदोलन केले.
त्या हत्येचे नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. मालेगाव, मनमाड, येवला, दिंडोरी, कळवण, सटाणा, नाशिक शहर यांसह विविध ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी संशयित वाल्मीक कराड यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. काही ठिकाणी पुतळ्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले.
येवला येथे शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलन करण्याबरोबरच पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यात राज्य सरकारचे काही लोक देखील त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवून आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे याबाबत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. तरीही त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली जावी. त्यांनाही या खटल्यात सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
मंत्री मुंडे यांच्या पाठिंब्याशिवाय वाल्मीक कराड आणि त्यांचे गुन्हेगार सहकारी एवढ्या बेदरकारपणे गुन्हे करण्यासाठी मोकळे झाले नसते. बीड जिल्ह्यात या गुन्हेगारांनी मांडलेला हैदोस समाजाला अतिशय घातक आहे. त्यामुळे अनेकांना त्याची झळ बसली आहे, असा दावा शिवसेना शिंदे पक्षाचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, श्रावण देवरे, संतोष वलटे आदींनी केले.
मालेगाव येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाल्मीक मुंडे आणि पोलिसांविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आंदोलन केले. संतोष देशमुख यांचा खून ज्या पद्धतीने झाला ते काळीमा फासणारी आहे. असे प्रकार यापुढे घडू नये, अशी अद्दल कायमस्वरूपी घडली पाहिजे. त्यासाठी वाल्मीक कराड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना न्यायालयाने फाशीचे शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे नेते विनोद वाघ, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, धर्मा भांबरे, सर्जेराव जाधव आदिलसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते जमा झाले होते.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.