Manikrao Kokate Politics: मंत्र्याच्या कन्येने न्यायालयालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले का?, काय आहे प्रकरण?

Manikrao Kokate: Agriculture Minister Manikrao Kokate`s daughter feel relief after court stayed to sentence-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यावर कोकाटेंची कन्या म्हणाली, ‘सत्य परेशान हो सकता हे, पराजीत नही’
Simantini Kokate & Manikrao Kokate
Simantini Kokate & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate news: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने आज स्थगिती दिली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. या निकालामुळे श्री. कोकाटे यांचे मंत्रीपद तसेच विधीमंडळाचे सदस्य यावरील अनिश्चितता दूर झाली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री दहा टक्के कोट्यातील सदनिका मंजूरीत गैरप्रकार केल्याबाबत दोषी ठरविण्यात आले होते. बनावट व खोटी कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यात त्यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावला.

Simantini Kokate & Manikrao Kokate
Manikrao Kokate Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, दुसऱ्या मंत्र्यावरील संकट टळले!

आज जिल्हा वरिष्ठ न्यायालयाने कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यावेळी तक्रारदार, माजी मंत्री (कै.) तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड, अॅड आव्हाड आणि शरद शिंदे पाटील यांच्या हस्तक्षेप याचिका देखाल फेटाळण्यात आल्या. त्यामुळे हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला देखील दिलासा ठरला.

Simantini Kokate & Manikrao Kokate
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांना स्वतःच्याच गावातून मिळाला 'घरचा आहेर'; जोर्वेच्या ठरावामुळे राजकारण पेटलं

या निकालावर कोकाटे समर्थकांनी आनंद व्यक्त केला. याबाबत मंत्री कोकाटे यांच्या कन्या सिमांतिनी कोकाटे यांनी अतिशय उत्साही प्रतिक्रीया व्यक्त केली. त्या म्हणाले, आमच्या विरोधकांनी जाणीवपूर्व या तीस वर्षांपूर्वीच्या प्रकरणाला चर्चेत आणले होते. मात्र न्यायालयाने त्याचे मनसुभे यशस्वी होऊ दिले नाही,

श्रीमती कोकाटे म्हणाल्या, ‘सत्य परेशान हो सकता हे, पराजीत नही’. त्यामुळे त्यांच्या मते कनिष्ठ न्यायालयाने ४० पानांच्या निकालात श्री. कोकाटे दोषी आढळले होते. पुरावे व साक्ष तपासून दिलेला निवाडा सत्य नव्हता की काय? अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात येऊन गेली. एक प्रकारे हा न्यायालयावरच तर प्रश्नचिन्ह नाही ना? अशीही चर्चा आहे.

तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर श्री. कोकाटे मंत्री झाले होते. त्यांनी नुकतेच शेतकऱ्यांसाठी काम सुरू केले होते. त्यांच्या मनात शेती व शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी नुकतेच कामाला सुरवात केली होती. मात्र २० फेब्रुवारी आलेल्या निकालाने कोकाटे समर्थक निराश झाले होते. है नैराश्य आता दूर झाले आहे. मात्र उत्साहत दिलेल्या मंत्र्यांच्या कन्येची ‘सत्य परेशान हो सकता हे, पराजीत नही’ ही प्रतिक्रीया चर्चेला विषय देऊन गेला.

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com