Sanjay Raut News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांचा दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. माध्यमांशी बोलण्याऐवजी संघटनात्मक हितगुज केले होते.
या दौऱ्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली चक्रे फिरविली. त्यांनी आज मोठे संघटनात्मक फेरबदल केल्याची घोषणा केली. यामध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना बढती देत उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे कायम आहेत. या नियुक्त्या प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे पक्षात आणखी काही बदल होण्याची चिन्हे आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्याचबरोबर विविध नेत्यांना पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे.
त्या दृष्टीने शिवसेना शिंदे पक्षाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे पक्षात मोठे बदल झाले आहेत. या संदर्भात महायुतीमध्ये काय हालचाली होतात, यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते लक्ष ठेवून आहेत. महायुतीत सुरू असलेल्या मेगाभरतीमुळे ऐन निवडणुकीत मोठी नाराजी उद्भवण्याची चिन्हे आहेत.
महायुतीतील नाराजीचा लाभ शिवसेनेचे स्थानिक नेते घेण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे सध्या तरी अनेक प्रमुख आणि महापालिका निवडणुकीवर प्रभाव टाकतील असे नेते आहेत. त्यामुळे अद्यापही शिवसेना शिंदे पक्षाची चिंता दूर झालेली नाही. त्यामुळे आगामी काही काळात शिवसेनेच्या या दोन्ही पक्षांमध्ये आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार राजकीय रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
या दृष्टीने शिवसेना नेते राऊत यांनी पत्ते पिसले आहेत. नवे पदाधिकारी अधिक जोमाने कामाला लागतील, या दृष्टीने राऊत यांचे नियोजन असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट कोणते डावपेच आखतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.