Eknath Shinde With Ex Corporators Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemlata Patil : डॉ. हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश होता होता राहिला...काय घडले कारण!

Ex-corporators in Shiv Sena Shinde group : शिवसेना शिंदे गटात माजी नगरसेवकांचे इनकमिंग जोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शिवसेना शिंदे पक्षात दाखल.

Sampat Devgire

Nashik News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विविध असंतुष्ट नेत्यांना मधाचे बोट लावण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे या पक्षात सोमवारी पुन्हा एकदा जोरदार इनकमिंग झाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष जोमात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. यामध्ये शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाने आघाडी घेतली आहे. या पक्षाकडून विविध पक्षांतील नाराज आणि असंतुष्टांना आकर्षित करण्याचे काम सुरू आहे.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका समिना मेमन, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विक्रम नागरे आणि माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.

खासदार श्रीकांत शिंदे यांसह पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख बंटी तिदमे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कमी काळात आणखी काही महत्त्वाचे नगरसेवक पक्षात दाखल होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेले विक्रम नागरे हे मूळ भारतीय जनता पक्षाचे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी यू टर्न घेतला आहे. ते किमान वेतन सल्लागार समितीचे पदाधिकारी होते. सत्ताधारी पक्षाशी जवळीक म्हणून त्यांनी हा प्रवेश केल्याचे बोलले जाते.

गेले काही दिवस माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार याची चर्चा होती. त्याला दोन आठवडे झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाकडून त्याबाबत कोणीही त्यांच्याशी संपर्क केलेला नाही. पक्षाच्या नाशिकच्या संपर्कप्रमुखांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने त्यांना आता बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

या पार्श्वभूमीवर डॉ पाटील यादेखील सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असे बोलले जात होते. डॉ पाटील या प्रवेशासाठी ठाणे येथे गेल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. मात्र प्रवेश करण्याचा निर्णय ऐनवेळीरद्द केला. त्यामुळे डॉ पाटील यांच्याबाबत काल शहरात विविध चर्चा पसरल्या होत्या. त्यावर डॉ पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

यानिमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाने अतिशय आक्रमक होत आपल्या विस्तार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे महायुतीला देखील त्याची चिंता सतावू लागली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षातील इनकमिंग संथ झाले होते. त्याला आता पुन्हा एकदा गती आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT