Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांमध्ये 'डिनर डिप्लोमसी'; 'स्थानिक' निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

Eknath Khadse News: राजकारणातील बलाढ्य नेते म्हणून एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात नेहमीच एकमेकांवर तूटून पडणारे, एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत.

Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon 28 Jan 2025: राज्याचे माजी महसुलमंत्री, उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी आहे. दोन्ही नेत्यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. नंतर त्यांनी एकत्र जेवण घेतले.

जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात सोमवारी एकत्रित स्नेहभोजन केले. याठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. पाटील-खडसे यांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती, पण त्यांचा भाजप प्रवेश रखडला.


Maharashtra Politics
Sanjay Nirupam: हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून काँग्रेस काय साध्य करू इच्छिते? शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

गिरिश महाजन यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला आडकाठी केली असे सांगितले जाते. त्यावर खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. खडसे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारणातील बलाढ्य नेते म्हणून एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात नेहमीच एकमेकांवर तूटून पडणारे, एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत.

गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे हे दोन्ही एकमेकांवर सतत टीका करणारे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एकत्र जेवणाच्या व्हिडिओने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले आहे. या भेटीत दोघांनी अर्धा तासपर्यंत चर्चा केली, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


Maharashtra Politics
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; तानाजी सावंत एकाकी

गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे यांच्या एकत्र जेवणाची राज्यात चांगलीच चर्चा सुरु आहे. आता एकनाथ खडसे हे शरद पवारांना सोडणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. गुलाबराव पाटील अन् एकनाथ खडसे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र, दोघांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com