Girish Mahajan & Sanjay Raut
Girish Mahajan & Sanjay RautSarkarnama

Girish Mahajan : गिरीश महाजन शिवसेना नेते संजय राऊत यांना म्हणाले...

Girish Mahajan advice to Sanjay Raut : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना वेगळाच सल्ला दिला आहे.
Published on

Nashik News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्याचा समाचार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. त्यांनी खासदार संजय राऊत यांना सल्ला देखील दिला.

खासदार राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. राऊत यांची किती दखल घ्यावी असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Girish Mahajan & Sanjay Raut
Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांचा विषय एका वाक्यात संपवला...

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत. त्यांच्या पक्ष किती शिल्लक आहे, हा देखील काळजी करण्याचा विषय आहे. खासदार राऊत यांनी त्याकडे अधिक लक्ष दिले तर ते त्यांच्या फायद्याचे ठरेल.

Girish Mahajan & Sanjay Raut
Sanjay Raut Politics: संजय राऊत म्हणतात, "हा तर अदानींचा अपमान"

खासदार राऊत यांना उडता बसता फक्त भारतीय जनता पक्ष दिसतो. रोज उठून ते भाजपवर टीका करतात. भाजपला सल्ले देतात. सध्या तरी त्यांच्या सल्ल्याची भाजपला अजिबात गरज नाही.नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीच्या बाजूने जनतेचा कौल आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आत्मविश्वासाने राज्याचा कारभार करीत आहेत.

खासदार राऊत यांनी इतरांचे काय आहे आणि काय सुरू आहे, याची काळजी करू नये. त्यापेक्षा त्यांनी आपल्या पक्षाची काय स्थिती आहे. याचे आत्मपरीक्षण करावे तेच त्यांच्या हिताचे ठरेल.

पालकमंत्री पदाचा कोणताही वाद नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात तीन राजकीय पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे काही प्रश्नांवर चर्चेसाठी वेळ जावा लागतो पालकमंत्री पदाचा निर्णय देखील सहमतीने होईल. भारतीय जनता पक्ष नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दावेदार आहे. मात्र पालकमंत्री पदासाठी आंदोलन करणे योग्य नाही असेही त्यांनी सहकारी पक्षांना ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com