Vijay Karanjkar, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : एकनाथ शिंदेंच्या आप्पांनी भाजपची खोड मोडली, भगूरचा बदला सिन्नरमध्ये घेतला? एका दगडात दोन शिकार

Eknath Shinde ShivSena : सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिवसेनेने युती घोषित केली होती. राष्ट्रवादीविरोधात एकत्रित लढायचं असं ठरलं होतं. पण शिवसेनेने ही युती तोडली आहे.

Ganesh Sonawane

Sinnar politics : सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी चार दिवसांपूर्वी भाजप व शिवसेना(शिंदे) पक्षाने मिळून युतीची घोषणा केली होती. मात्र आता शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देत भाजप सोबतची युती तोडली आहे. यामागे भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे राजकारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शनिवारी भगूर नगरपालिकेच्या निडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडल्या. भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय (आप्पा) करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र करंजकर यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने व भाजपने मिळून भगूरमध्ये वेगळी चूल मांडली.

येथे शिवसेना(शिंदे) पक्षाविरोधात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्ष एकत्र आला. भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने प्रेरणा बलकवडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. येथे भाजप व राष्ट्रवादी मिळून करंजकर यांच्याविरोधात लढणार आहे. त्यावरुन करंजकर यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती.

भगूरमध्ये भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येत करंजकर यांना आव्हान दिल्यानेच सिन्नरममध्ये राष्ट्रवादीला व भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेने(शिंदे) सिन्नरमध्ये भाजपसोबतची युती तोडली. तर राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचे समर्थक व नगराध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या नामदेव लोंढे यांना सोबत घेतल्याचे बोलले जात आहे.

रविवारी शिवसेनेने अचानक नामदेव लोंढे यांना पक्षात प्रवेश देत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. भाजपसोबत केलेली युती शिवसेनेने मोडली. भगूरचा बदला घेण्यासाठीच करंजकर यांनी एका दगडात भाजप व राष्ट्रवादी दोघांनाही निशाणा बनवत अद्दल घडवल्याचे बोलले जात आहे.

लोंढे हे माणिकराव कोकाटे यांचे समर्थक आहे. राष्ट्रवादीकडून नगराध्यपदासाठी त्यांना उमेदवारी फिक्क झाल्याचे बोलले जात होते. पण कोकाटे आणि लोंढे यांच्यात बोलणी सुरु असतानाच शिवसेनेने लोंढेंना गळाला लावले. त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

सिन्नरमध्ये भाजपकडून हेमंत वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिन्नरमध्ये आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोकाटे यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जातो याकडे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT