Sinnar Politics : माणिकराव कोकाटेंचा समर्थक शिवसेनेला जाऊन मिळाला, भाजपलाही झटका, सिन्नरच्या राजकारणात मोठी उलथापालथ

Manikrao Kokate Supporter Namdev Londhe Join Shivsena : माणिकराव कोकाटे यांचे समर्थक नामदेव लोंढे यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून त्यांना नगराध्यपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे.
Hemant Godse
Manikrao Kokate,
Hemant Godse Manikrao Kokate, Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. येथील शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्याच्या चौथ्याच दिवशी तुटली आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील नगराध्यक्षपदाचे दावेदार असलेले नामदेव लोंढे शिवसेना (शिंदे) गटाच्या गळाला लागले असून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नामदेव लोंढे यांना शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे व भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी सिन्नरमध्ये येऊन उदय सांगळे यांच्या संपर्क कार्यालयात नगर परिषद निवडणुकीत सेना-भाजप युतीची घोषणा केली होती. त्यानुसार भाजप नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देणार होते. राष्ट्रवादीविरोधात शिवसेना व भाजप मिळून मैत्रिपूर्ण लढत करेन असं ठरलं होतं. मात्र, ही युती चारच दिवसात फिस्कटली आहे.

शिंदे शिवसेनेने सिन्नरमध्ये मोठा डाव टाकला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक नामदेव लोंढे यांना गळाला लावत शिवसेनेत प्रवेश दिला आहे. शिवाय त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युती तुटली आहे. तसेच मंत्री कोकाटे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता सिन्नरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Hemant Godse
Manikrao Kokate,
Nashik APMC Corruption : नाशिक बाजार समिती 12 कोटींचा भ्रष्टाचार? अजित पवारांच्या 'शिलेदारा'चा भाजप सभापतींवर गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने तीसपैकी पंधरा जागांची मागणी केल्याने धुसफूस सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु मुख्य कारण शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांना विश्वासात न घेता युती जाहीर केल्याने युती फिस्कटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक असलेले माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे रविवारी सायंकाळी शिंदे गटात प्रविष्ट झाले व त्यांनी शिवधनुष्य हाती घेतले. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्यासह भाजपला धक्का बसला आहे. सेना-भाजप युत्ती निवडणूक रंगण्याआधीच तुटली आहे.

Hemant Godse
Manikrao Kokate,
Chhagan Bhujbal : भुजबळांची ताकद वाढली ! विधानसभेला दुरावलेले दोन मातब्बर नेते पुन्हा आले जवळ, जिल्हा परिषद लढतीची तयारी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी (रविवारी) नामदेव लोंढे यांचा शिवसेना प्रवेश झाल्याने सिन्नरला आणखी चुरस वाढली आहे. लोंढे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, उपनेते विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, उपजिल्हाध्यक्ष दीपक खुळे, तालुकाध्यक्ष योगेश म्हस्के यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com