Srigonda Bazaar Committee
Srigonda Bazaar Committee Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदासाठी संचालकांचे गुडघ्याला बाशिंग; अनेकांनी लावली फिल्डींग?

सरकारनामा ब्यूरो

Political News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. त्यानंतर बाजार समित्यांचे निकालही समोर आले. मात्र, आता बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू झाली आहे.

अनेक संचालकांनी सभापती व उपसभापती पदासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड गुरुवारी (दि.18 मे) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभापती आणि उपसभापतीपदासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू आहे.

श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदासाठी राहुल जगताप यांच्या गटाकडून साजन पाचपुते आणि अतुल लोखंडे यांचे नाव चर्चेत आहे. सभापतीपदासाठी जगताप गटाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सभापतीपदाची माळ अखेर कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत राहुल जगताप यांच्या गटाने 18 पैकी 11 जागा जिंकल्या. तर पाचपुते आणि नागवडे गटाने 7 जागा जिंकल्या. आता सभापतीपदासाठी अतुल लोखंडे आणि साजन पाचपुते यांचे नाव आघाडीवर आहे. असे असले तरी सभापतीपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT