Ahmednagar News: नगर बाजार समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? 'ही' नावे चर्चेत

Ahmednagar Market Committee : बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अनेकांकडून रस्सीखेच सुरू
Ahmednagar Market Committee
Ahmednagar Market Committee Sarkarnama

Ahmednagar News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. त्यानंतर बाजार समित्यांचे निकालही समोर आले. मात्र, आता बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू झाली आहे.

अनेकांनी सभापती व उपसभापती पदासाठी फिल्डींगही लावल्याची चर्चा आहे. अहमदनगर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेते शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. आता बाजार समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagar Market Committee
Jamkhed News: शिंदे-पवारांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदासाठी रस्सीखेच

अहमदनगर बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी आठवडाभरात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगर बाजार समितीच्या निवडणुकीत कर्डिले गटाचे 18 संचालक निवडून आले. आता या 18 संचालकांपैकी अनेक संचालक हे सभापती आणि उपसभापती पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

Ahmednagar Market Committee
Parner News: पारनेर बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदी कुणाची वर्णी? लंकेंसमोर मोठा पेच; 'ही' नावे चर्चेत

दरम्यान, हरिभाऊ कर्डिले, सुधीर भापकर, मधुकर मगर, संतोष म्हस्के, भाऊसाहेब बोठे यांच्यासह अजून काही नावे सभापती आणि उपसभापती पदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे आता बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com