Nashik NMC News : विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पार्श्वभूमीवर मतदान कसे करावे याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण वर्ग घेतला. मात्र हा प्रशिक्षण वर्ग वेगळ्याच हलक्याफुलक्या चर्चेने रंगला. नाशिक विधान परिषद निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून दिवसभर राजकारण रंगले होते.
शिवसेना भाजप महायुतीतर्फे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली. स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप तर्फे उमेदवारी असल्याचा त्यांचा दावा आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे प्रशासनातर्फे मतदारांचे प्रशिक्षण झाले. महापालिकेतर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचे प्रशिक्षण झाले. मात्र या प्रशिक्षण वर्गात अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये द्विअर्थी संवाद चांगलाच रंगला.
अधिकाऱ्यांनी या निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय असेल. मात्र पहिली पसंती 'नोटा'ला दिल्यास ते मत बाद होईल. कारण ते मत मोजले जाणार नाही असे स्पष्टीकरण प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर एका नवनिर्वाचित नगरसेवकाने हात वर करत वेगळीच शंका उपस्थित केली. 'नोटा' बाद होणार आहे. मात्र मतमोजणी करताना 'नोटा' कोणी दिल्या आणि कोणाला दिल्या, हे मोजले गेले पाहिजे ना, असा द्विअर्थी प्रश्न केला.
नवनिर्वाचित नगरसेवकाच्या या शंकेने उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली. विधान परिषद निवडणुकीत मोजके मतदार असल्याने आणि पसंती क्रमाने मतदान आहे. प्रशासनाने त्यामुळे मतदारांना प्रशिक्षण दिले. मतदान बाद होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. मतदानासाठी स्वतःचा पेन वापरता येणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी पुरविलेला अधिकृत पेन मतदानासाठी वापरावा लागेल. आपल्या उमेदवाराच्या नावासमोर १,२ असे आकड्यात आणि उतरत्या पसंती क्रमाने लिहावे लागेल. मतदार उमेदवारांना केवळ एकच पसंती क्रमांक देऊ शकतात. या निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवारांना एक पसंती क्रम दिल्यास ते मत बाद होणार आहे. पहिल्या पसंतीचे मत 'नोटा' या पर्यायाला दिल्यास ते मोजले जाणार नाही. यांसह मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
यावेळी शिवसेना-भाजप महायुतीच्या एका नगरसेवकाने महा विकास आघाडीच्या नगरसेवकाला तुमच्या मतांची गरज नाही. तुम्हाला पक्षश्रेष्ठी सांगतील त्यालाच मतदान करावे लागणार आहे, असे सांगितल्याने वाद निर्माण झाला.
यावेळी काही ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने तो मिटला. महायुतीचे उमेदवार माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रचाराच्या संधीसाठी उपयोग करून. यावेळी त्यांनी विविध नगरसेवकांच्या भेटी घेऊन सहकार्याचे आवाहन केले. त्यामुळे दराडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय मोर्चे बांधणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.