Hemant Godse at electrical lab Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : खासदार हेमंत गोडसेंचा पुन्हा एकदा इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा वादा!

Electrical testing lab will be starts very soon in Nashik-नाशिकला रेंगाळलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा लवकरच प्रारंभ होईल, असा दावा खासदार गोडसे यांनी केला.

Sampat Devgire

Hemant Godse News : शहरातील केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या टेस्टिंग लॅबचे काम पूर्णत्वाकडे आहे. या लॅबच्या कामाची पाहणी आज खासदार हेमंत गोडसे यांनी केली. येत्या दोन महिन्यांत केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण होईल, असा दावा या वेळी गोडसे यांनी केला. (MP Hemant Godse claim that electrical lab will be starts in next 2 Months)

नाशिक (Nashik) शहरात दहा वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या इलेक्ट्रीकल टेस्टिंग लॅबचे काम पूर्ण होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, असे खासदार गोडसे (Hemant Godse) यांनी सांगितले.

सध्या इलेक्ट्रिकल उत्पादनाचा दर्जा तपासणीसाठी बंगळुरू, भोपाळ येथे जावं लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर होताे. नव्या प्रयोगशाळेमुळे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यांमधील इलेक्ट्रिक उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खासदार गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शिलापूर शिवारात शंभर एकर जागेत उभारलेली राज्यातील पाहिली, तर देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही इलेक्ट्रीकल लॅब असणार आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झाले. कोरोनामुळे प्रकल्पाचे काम मंदावले होते. गेल्या दीड वर्षापासून प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

आता प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याने आज या प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण कुमार, राम बाबू, के. एस. वर्मा या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पासाठी एकलहरे येथून दोनशे वीस केबीचा पॉवर सप्लाय घेण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब प्रकल्पातील प्रयोगशाळेचे काम पूर्णत्वाकडे असून सर्व काम ऑनलाईन असणार आहे. आज श्री गोडसे यांनी त्याची पाहणी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शिलापुरचे माजी सरपंच रमेश कहांडळ, सरपंच पवन कहांडळ, सय्यद पिंपरीचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, विंचूर गवळीचे सरपंच विजय रिकामे, शिलापूर सोसायटीचे चेअरमन गणेश कहांडळ, रमेश कहांडळ आदी उपस्थित होते.

केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या टेस्टिंग लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर अखेरपर्यत प्रयोगशाळेचा शुभारंभ होईल. केंद्रीय मंत्री आर.के.सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभाचे नियोजन आहे.

- हेमंत गोडसे (खासदार नाशिक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT