NCP Leader Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar News: वीज सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही!

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर नापसंती व्यक्त केली.

Sampat Devgire

नाशिक (Nashik): केंद्र सरकारने (Centre) वीज बिल सुधारणा विधेयक लोकसभेत (Loksabha) मंजूर केले, तरीही राज्यसभेत (Rajyasabha) विरोधक ते रोखतील. हे विधेयक ग्राहक व वीज वितरण (Electricity amendment Bill) दोन्हींच्या हिताचे नाही. त्याला या घटकांकडून विरोध होत असल्याने केंद्र सरकारने त्याबाबत विचार केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला. (NCP Leader Sharad Pawar said, Electricity bill is not in the interest of employee)

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वीसावे त्रैवार्षिक अधिवेशन आज येथे झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अधिवेशनासाठी राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी वर्कर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन शर्मा, भारतीय जनसभेचे राष्ट्रीय महासचिव अतुलकुमार अंजान तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शरद पवार म्हणाले, राज्याच्या विकासासाठी विज कर्मचारी जे काम करत आहे ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही. त्यांच्या योगदानाची शासनाने दखल घेतली पाहिजे. यादृष्टीने त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी फेजरेशनने सातत्याने प्रशास चे लक्ष वेधले आहे. मात्र त्यावर गांभिर्याने काम झालेले नाही. असे दुर्लक्ष करणे वीज क्षेत्राच्या दृष्टीने देखील योग्य नाही. त्यांच्या सुचनांची योग्य दखल घेऊऩ त्यावर विचार झाला पाहिजे.

श्री. पवार पुढे म्हणाले, संसदेत विज सुधारणा बिल 2022 केंद्र सरकारने आणले आहे. त्याला आमचा विरोध आहे. केंद्र शासनाचा सुधारीत विद्युत कायदा जसाच्या तसा आम्ही मान्य करणार नाही. त्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर लोकसभेत जरी तो कायदा पास केला तरी राज्यसभेत आम्ही तो संमत होऊ देणार नाही.

सरकारने नवा कायदा करण्यापेक्षी वीज मंडळातील विज कर्मचाऱ्याची वर्ग 3 आणि वर्ग 4 श्रेणीतील चाळीस हजार पदे रिक्त आहेत. आधी ती भरावीत. जुन्या पेन्शनविषयी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आमची तयारी आहे.

संसदेत पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. मात्र या भाषणात अनेक महत्त्वाच्या विषय़ाचा उल्लेख त्यांनी केला नाही. पंतप्रधान मोदी संसदेतील आपल्या भाषणातून कष्टकऱ्यांविषयी एक शब्दही बोलले नाहीत, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT