Devendra Fadnavis Praised Modi: देशाच्या इतिहासात मोदींचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल; फडणवीसांचे गौरवोद्गार

PM Modi's Mumbai Visit: ''वंदे भारत ट्रेन ही भाविक आणि प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरेल...''
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ''कोणी कल्पाना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल. मात्र, नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे. त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं. त्यामुळे त्यांचे आभार मानायला हवे'', असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Kasaba By-Election : 'कसब्या'त आघाडीला मोठा दिलासा तर भाजपची धाकधूक वाढली; 'हे' आहे कारण

''वंदे भारत एक्सप्रेस ही शिर्डी आणि सोलापूर या दोन ठिकाणी धावणार आहे. त्यामुळे साईबाबा आणि आई भवानीचा आशीर्वाद मिळणार आहे. महाराष्ट्रातील या ट्रेनच्या प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदी यांनी तब्बल १३ हजार कोटी दिले.

वंदे भारत ट्रेन ही भाविक आणि प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाला पंतप्रधान मोदींनी भरभरून मदत दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच पंतप्रधान मोदींचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिले जाईल'', असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

Devendra Fadnavis
Rajasthan Budget : अर्थसंकल्प सादर करताना मोठी चूक; मुख्यमंत्र्यांनी जुनाच अर्थसंकल्प वाचला, नेमकं काय घडलं?

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नरेंद्र मोदी यांना गणपतीची मुर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच २२ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दोऱ्यावर आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com