Sandesh Karle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : खासदार लंकेंच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा 'डोळा'; 'मविआ'त बंडाचा इशारा, कसा मार्ग निघणार?

Shiv Sena Thackeray party claim on Parner-Nagar Assembly Constituency : खासदार नीलेश लंके यांचा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा ठोकल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केलाय. शिवसैनिक या मतदारसंघाबाबत आक्रमक असून, जागा न सुटल्यास बंडखोरी होईल, असा इशारा देण्यात आलानं जागेबाबत पेच निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे जुने निष्ठावान नेते संदेश कार्ले यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह खासदार लंके यांच्या खेम्यात अस्वस्थता पसरली आहे. संदेश कार्ले यांच्या आक्रमक पवित्र्यामागं शिवसैनिकांचं बळ असल्याची चर्चा आता रंगलीय.

नीलेश लंके यांनी 2019 मध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवली. विजय औटी यांच्याविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा लंके यांना झाला आणि ते आमदार झाले. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी फुटीनंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग लोकसभा 2024 निवडणुकीत यशस्वी झाला. यात भाजपचे सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं नीलेश लंके यांना उतरवलं. नीलेश लंके आणि सुजय विखे यांच्या कडवी झुंज झाली आणि लंके खासदार झाले. आता नीलेश लंके यांच्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार कोण? याची चर्चा आहे. या जागेवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केला आहे.

संदेश कार्ले यांनी या जागेबाबत आक्रमक पवित्रा घेत भूमिका मांडली. संदेश कार्ले म्हणाले, "पारनेर-नगरची जागा शिवसेनेकडे मागत आहोत. तुकाराम गडाख, दिलीप गांधी, सुजय विखे (Sujay Vikhe) इथं खासदार झाले. राष्ट्रवादीचा क्लेम नसताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार झाला". शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पारनेर-नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचा आमदार खासदार झाला आहे. त्याची पावती म्हणून पारनेर-नगरमध्ये त्यांनी, थांबवा आणि ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, असं म्हणत संदेश कार्ले यांनी एकप्रकारने खासदार नीलेश लंके यांना ठणकावलं आहे.

''मविआ'त जागा वाटपावर वाटाघाटी सुरू आहेत. ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वाट्याला आली नाही, तर शिवसैनिक अन्याय सहन करणार नाही. शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे अन्याय झाल्या, इथं वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे. बंडखोरीची शक्यता आहे. काय होईल, काय सांगता आहे. आम्ही उद्धव ठाकरेसाहेबांचा आदेश मानतो. शिवसैनिकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यास, त्यांना कोणीही रोखू शकणार नाही', असंही संदेश कार्ले यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंना 'CM'चा चेहरा म्हणून पुढं आणा

पारनेर-नगरमधून शिवसेनेचा तीन वेळा आमदार झाला आहे. राष्ट्रवादीचा एकवेळा आमदार झाला आहे. गेल्यावेळी मतविभाजन झाले. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. शिवसैनिकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार केला आहे. त्यामुळे आता ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाली पाहिजे. मनाचा मोठेपणा दाखवावा. खासदारकीचा जागा राष्ट्रवादी होती म्हणून, त्यांना दिली, असं होत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देखील 'मविआ'त पुढे आणत नाही. ती देखील शिवसैनिकांमध्ये असंतोषाची ठिणगी आहे, असेही संदेश कार्ले यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT