Bhagwansingh Chouhan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

EVM Controversy : काय सांगता? EVM सेटिंगवाल्याच्या दाव्यानुसार ८ हजार मतांनीच झाला ‘या’ उमेदवाराचा पराभव!

EVM Setting Allegations Candidate Loses by 8000 Votes: विधानसभा निवडणुकीत दरम्यान राजस्थानच्या एकाने नाशिक मध्य मतदारसंघाचा अचूक निकाल सांगत दिली होती ईव्हीएम सेटिंगची ऑफर.

Sampat Devgire

Mumbai News: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. विविध राजकीय पक्षांनी मतदान यंत्रांच्या सेटिंगचा विषय उपस्थित करीत, मोठा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक मध्य मतदार संघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार, माजी आमदार वसंत गीते यांना देण्यात आलेली ऑफर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना ५ नोव्हेंबरला माजी आमदार गीते यांच्या कार्यालयात येऊन भगवानसिंग चौहान याने मतदान यंत्र सेटिंग करणारी यंत्रणा आपल्या संपर्कात आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघात अशी सेटिंग करून देतो, असे सांगितले होते.

श्री. चौहान याने तुम्हाला निवडणूक जिंकायची असल्यास मी सेटिंग करून देऊ शकतो. त्यासाठी चाळीस लाख रुपये द्यावे लागतील, अशी ऑफर दिली होती. हे प्रकरण किरकोळ समजुन माजी आमदार गीते यांच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतरही त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नव्हता. या व्यक्तीला लगेचच जामीन देखील मिळाला. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

संबंधित संशयित भगवान सिंग याने नाशिक मध्य मतदार संघात तुम्हाला आठ हजार मतांनी मशीन सेटिंग करावी लागेल, आठ हजार मतांच्या फरकानेच तुमचा विजय किंवा पराभव होऊ शकतो. त्यासाठी बेल ही कंपनी आणि तिचे तंत्रज्ञ मशीनची सेटिंग करतात. शासनाकडून त्यांना याबाबतचे अधिकार देण्यात आलेले आहे. हे सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत.

मी तुम्हाला सेटिंग करून देऊ शकतो. ही सेटिंग निवडणूक चिन्हानुसार केली जाते. तुम्ही सेटिंग करण्यास सांगितल्यास, मी तुमच्या निवडणुकीचा निकाल तुमच्या बाजूने लावू शकतो, असे संबंधित व्यक्तीने सांगितले होते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर आणि मतदानाचे आकडेवारी लक्षात आल्यानंतर नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा आठ हजार मतांच्या फरकांनीच पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला आठ हजार मते अधिक मिळाले असते तर, ते निवडून आले असते.

संबंधित आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी किती गांभीर्याने तपास केला, हा देखील चर्चेचा विषय आहे. पोलिसांनी अटक केल्यावर संबंधित व्यक्ती अगदी निर्धास्त वावरत होती. त्याने पोलिसांना युट्युब वरून मिळालेल्या माहितीवरून आपण उमेदवाराला संपर्क केला होता, असे सांगितले. प्रत्यक्षात ही घटना घडली तोपर्यंत मतदान यंत्रात सेटिंग करण्याचा कोणताही व्हिडिओ अथवा प्रकार Youtube वर उपलब्ध नव्हता, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संशोधन आणि तपासातून स्पष्ट झाले आहे.

निवडणूक निकालावर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. आता मतदान यंत्राबाबत ते राज्यभर सह्यांची मोहीम राबविणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याबाबत न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यापूर्वीच मतदान यंत्रांबाबत तक्रार केली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशीन सेटिंग बाबत पुणे येथे संशय व्यक्त केला आहे. या स्थितीत त्याला बळ देणारी घटना नाशिकमध्ये निवडणुकीदरम्यान घडली होती. ती चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT