Dada Bhuse : मंत्री दादा भुसे यांना प्रमोशन? उपमुख्यमंत्री पदासाठी भुसे यांच्या नावाची चर्चा जोरात!

Dada Bhuse's name discussed for Deputy Chief Minister: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून यापुर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दादा भुसे यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.
Dada Bhuse & Eknath shinde
Dada Bhuse & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची आता चर्चा सुरू आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. यात नाशिकला मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत.

शिवसेना नेते आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, असे बुधवारी जाहीर केले होते. त्यामुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? याबाबत भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

Dada Bhuse & Eknath shinde
Nashik BJP : नाशिकच्या `या` आमदाराचा खणखणीत इशारा, बंडखोरांना पक्षप्रवेश दिल्यास देणार सामूहिक राजीनामे !

मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे आपले विश्वासू सहकारी आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना पक्षातील ज्येष्ठ सदस्य आणि विश्वासू सहकारी म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेले दोन दिवस याबाबत चर्चा सुरू असल्याने मालेगाव येथील भुसे यांचे समर्थक आनंदात आहेत.

Dada Bhuse & Eknath shinde
Eknath Shinde Politics: युती धर्म वाऱ्यावर, शिंदेंच्या शिलेदारांचा अजितदादांच्या उमेदवाराला दे धक्का!

या संदर्भात अनेक कार्यकर्ते यांच्या संपर्कात आहेत. श्री भुसे यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र भुसे यांना राज्य मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाईल. याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनीही संकेत दिले आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघातून मंत्री भुसे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथे शिवसेना शिंदे पक्षाची भूमिका बुधवारी जाहीर केली होती. ठाणे येथे झालेले या पत्रकार परिषदेला मंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते. मंत्री भुसे हे शिंदे यांचे विश्वासू आणि निकटवर्ती सहकारी असल्याने याबाबत आता उपमुख्यमंत्री पदाबाबत कयास बांधले जात आहेत.

मुख्यमंत्री शिंदे आणि दादा भुसे या दोघांचेही शिवसेना पक्षात अतिशय निकटचे संबंध राहिले आहेत. हे विविध घटनांतून देखील स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर काढलेल्या चित्रपटात दोन्ही भागांमध्ये दादा भुसे यांच्या विषयी भूमिका साकारण्यात आली आहे.

श्री. शिंदे मुख्यमंत्री पदी कार्यरत असताना सर्वाधिक खात्यांची जबाबदारी श्री भुसे यांच्याकडे होती. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये भुसे यांना कोणती भूमिका मिळेल, याविषयी चर्चा जोरात आहे. यामध्ये भुसे हे उपमुख्यमंत्री होतील असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com