Maharashtra Government Formation: ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांचे पत्ते कट? नव्या सरकारमध्ये असणार 'यंग ब्रिगेड'

Senior Leaders Removed for Young Brigade in New Government: महायुतीच्या नव्या सरकारमध्ये अनुभवी नेत्यांचे पत्ते कट होणार असून फडणवीस सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा आज दिल्लीतून होणार आहे. मंत्रिमंडळातील काही जणांच्या नावाची घोषणाही आज होण्याची शक्यता आहे. कुणाला कोणते खाते द्यावे, याबाबत दिल्लीत अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबत्त सुरु आहेत.

मंत्रिपदे वाटप करताना आमदारांचे प्रगतीपुस्तक, वय यांना प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये अनुभवी नेत्यांचे पत्ते कट होणार असून फडणवीस सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.

मंत्रिपदे देताना वयोमर्यादा निश्चित केली असून 50 पेक्षा कमी वय असणाऱ्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. मुख्यमंत्रिपदी फडणवीस यांचे नाव जाहीर होताच अन्य मंत्र्यांच्या नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Mahayuti Government Formation: शिवसेनेचा 'हा' नेता होणार उपमुख्यमंत्री? अजितदादांचे 9 शिलेदार होणार कॅबिनेटमंत्री...

आमदारपदी दोन, तीन, चार टर्म निवडून आलेले पण अद्याप मंत्रिपद न मिळालेल्या नेत्यांनी मंत्रिपदासाठी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कोणाच्या नावाची निवड करावी, हा मोठा पेच महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनावर जोरदार तयारी सुरु आहे. दोन डिसेंबरला हा नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे बोललं जाते.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Raj Thackeray: राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद; कारणं जाणून घेणार

भाजपला मिळणारी संभाव्य खाती?

  • मुख्यमंत्री

  • गृहमंत्री

  • उच्चशिक्षण

  • सामाजिक बांधकाम

  • जलसंपदा

  • वैदकीय

  • उर्जा

  • वने

  • आरोग्य

  • सहकार

शिवसेना मिळणारी संभाव्य खाती

  • नगरविकास

  • उद्योग

  • एमएसआरडीसी

  • पाणीपुरवठा

  • आदिवासी

राष्ट्रवादीला मिळणारी संभाव्य खाती?

  • महसूल

  • अर्थमंत्रालय

  • महिला बालविकास

  • कृषी

  • ग्रामविकास

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com