Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Sujay Vikhe : 'त्यांचे आमदार-खासदार-कार्यकर्ते पळून जाऊ लागले'; विखे म्हणाले, ''EVM' ला विरोध हा रडीचा डाव'

Sujay Vikhe on India Alliance EVM Protest : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीच्या 'EVM' विरोधात देशव्यापी आंदोलन उभारण्याच्या दिल्लीतील बैठकीवर टीका.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली आहे. इंडिया आघाडीची बैठक ईव्हीएम मशीनवरील मतदानाला विरोध करण्यासाठी देशपातळीवर आंदोलन उभं करत आहे. यासाठी दिल्लीत बैठकीत आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीवर माजी खासदार विखे यांनी टीका करताना, विरोधकांकडे बैठकीपुरती देखील संख्या राहिली नाही. आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आता पळून जाऊ लागले आहेत. त्यासाठी ही वातावरण निर्मिती केली जात आहे, असा टोला लगावला.

बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) सहभागी झाले होते. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडी दिल्लीत 'EVM' मशीनवरील मतदानाला विरोध करण्यासाठी देशपातळीवर आंदोलन उभं करणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक घेत आहे. याकडे लक्ष वेधल्यावर त्यांनी या बैठकीवर टीका केली.

सुजय विखे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत (Election) विरोधकांचा सुपाटा साफ झाला आहे. विरोधककांकडे बैठकीसाठी देखील संख्या राहिली नाही. त्यांचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते पळून जाऊ लागले आहेत. ते पळून जाऊ नये म्हणून यासाठी हे वातावरण तयार केले जात आहे".

इंडिया आघाडीची ही बैठक त्याचाच परिपाक आहे. 'EVM' मशीनवर शंका घेणं हा विरोधकांचा रडीचा डाव आहे. जनतेने महायुतीला कौल दिला असून आम्ही पुढची पाच वर्षे सर्वसामन्यांची कामे करणार आहोत, असे सुजय विखे म्हणाले.

महाराष्ट्रात विधानसभेतील पराभवानंतर विरोधकांनी 'EVM' विरोधात भूमिका घेतली आहे. देशपातळीवर 'EVM' विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असून त्याअनुषंगाने दिल्लीत बैठक पार होत आहे.

तर दुसरीकडे मारकडवाडी येथे 'EVM'च्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. यावरूनच भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी विरोधकांचा समाचार घेत हा त्यांचा रडीचा असल्याची टीका केली आहे.

दरम्यान, लोकसभेत पराभवानंतर सुजय विखे यांनी काही बूथवरील 'EVM' मशीनच्या फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे. मात्र विधानसभा निकालानंतर सुजय विखेंचे सूर बदलले असून आता त्यांनी 'EVM' चे समर्थन केले आहे.

अहिल्यानगरच्या जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्यात लढत झाली होती. सुजय विखेंचा यात पराभव झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT