Eknath Khadse News : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल चा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या एक्झिट पोल मध्ये खानदेशातील चारही जागांवर भारतीय जनता पक्ष निवडून येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.रावेर मतदार संघात रक्षा खडसे यांना उमेदवारी देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आक्रमक विरोध रोखण्याची विनोद तावडे यांनी खेळी केली त्याला यश आल्याचे दिसत आहे.
जळगाव,रावेर,धुळे, नंदूरबार हे खानदेशातील चार मतदार संघ आहेत.चारही मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे.एकनाथ खडसे भाजप मध्ये असताना त्यांनी या भागात पक्षाचे संघटन मजबूत केले. मात्र 2014 नंतर खडसे यांचे पक्षांतर्गत वाद झाले,त्यांना हळूहळू पक्षापासून दूर जावे लागले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे भाजपकडून विधानसभेत मुक्ताईनगर मतदार संघात उभ्या राहिल्या मात्र त्यांचा पराभव झाला.यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेत आमदार केले.
खानदेश सह उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) बळकट होण्यास त्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा होती.राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावरही एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला.तसेच त्यांनी सत्तधारी महायुती सरकार विरोधात हल्ला चढविला, त्यामुळे खानदेशातील सत्ताधारी भाजपला खडसे आव्हान ठरू शकतील अशी स्थिती दिसू लागली.यातच एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असल्याने त्यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांचे सासरे राष्ट्रवादी पक्षात असले तरी रक्षा खडसे यांनी भाजप पक्षाचे काम केले, जनसंपर्क कायम ठेवला.त्यामुळे केवळ 'खडसे' नाव असल्यामुळे उमेदवारी रद्द करणे योग्य नाही, असा सूर व्यक्त करण्यात आला.
दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे लढण्याची घोषणा केली, त्यामुळे भाजपासह महायुतीत चिंतेचा सुर दिसून आला. खडसे यांनी भाजप विरोधी उमेदवारी केल्यास खानदेशातील चारही भाजपच्या (BJP) जागा धोक्यात येण्याची शक्यता होती.त्यात भाजपला ते परवडणारे नव्हते. दुसरीकडे रक्षा खडसे यांचे कार्याचे प्रगती पुस्तक चांगले होते त्यामुळे केवळ सासरे विरोधी पक्षात आहे म्हणून उमेदवारी नाकारणे हेच कारण होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारली तर एकनाथ खडसे यांचा विरोध चारही जागांचे नुकसान करणारा ठरणार होता.अशा स्थितीत केंद्रातून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे यांचे एकेकाळचे सहकारी विनोद तावडे यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात येते आहे.
राज्यातील नेत्यांकडून काही प्रमाणात विरोध असतानाही तावडे यांनी रक्षा खडसे याना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.यानंतर राजकारण पालटले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून बाहेर पडण्याची घोषणा केली. आपण भाजपमध्ये जात असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला पक्षात प्रवेश करण्यास मंजूरी दिल्याचे त्यांनी जाहीर केले.
मात्र अद्यापही भाजपत त्यांचा प्रवेश झाला नाही. लोकसभा निवडणूकीत त्यांनी केवळ रावेर मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला.खानदेशात विरोधी पक्षात आक्रमक चेहरा नव्हता त्यामुळे त्याचा फायदा आताच्या निवडणूक अंदाजात भाजपच्या चारही जागा विजयी होताना दिसत आहे.यामध्ये विनोद तावडे यांनी केलेली खेळी यशस्वी होताना दिसून येत आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.