Shaneshwar Devasthan Shanishingnapur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shaneshwar Devasthan Fraud : तुम्हीही शनिदेवाच्या ऑनलाईन पूजेसाठी पैसे भरताय? तर थांबा! काँग्रेसची थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार!

Congress Files Complaint Over Fake App Scam Targeting Shaneshwar Devasthan Shanishingnapur in Newasa Ahilyanagar : नेवाशातील सोनई इथंल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे झाली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar police Congress complaint : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथल्या शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे 'ऑनलाईन पूजा व तेल अर्पण'चे बनावट ॲप तयार करून, शनि भक्तांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी यासंदर्भात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. या घोटाळ्याची चौकशीसाठी सोमवारी (ता. 9) बेमुदत उपोषण इशारा दिला आहे.

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे काही कर्मचारी बाहेरच्या लोकांना हाताशी धरून ट्रस्टच्या ॲपऐवजी बनावट ॲपद्वारे भक्तांची लूट करीत असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर (Social Media) व्हायरल होत होत्या. यावर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी 31 मे रोजी बनावट ॲपबाबत खुलासा केला. तसे काही ठिकाणी वृत्त देखील आले. याचा दाखला घेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामगार विभाग या घोटाळ्या प्रकरणावर चांगलाच आक्रमक झाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) संभाजी माळवदे, नेवासे शहराध्यक्ष अंजुम पटेल, बहुजन समाज पक्षाचे हरीष चक्रनारायण, छावा संघटनेचे रावसाहेब काळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना या घोटाळ्याप्रकरणी तक्रार देत, चौकशीची मागणी केली.

दोन लाखांच्या पुढे सभासद

ऑनलाईन पूजा ॲपद्वारे कोट्यवधी रुपये देवस्थानच्या तिजोरीत गेले नाहीत. भक्तांनी श्रध्दापूर्वक दिलेल्या पैशांचा वेगळ्याच ठिकाणी पाय फुटले असून, यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याचा तपास करून संबंधितावर कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. या ॲपचे दोन लाखांच्या पुढे सभासद आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी 1800 रुपये सभासद शुल्क घेतले आहे. याशिवाय पूजेच्या नावाखाली रक्कम वेगळीच असू शकते, असेही तक्रारीत म्हटले आहे.

दोन फेक ॲप

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पूजा ॲपची खात्री केली. त्यानंतर दोन ॲप परवानगी न घेता कार्यरत असल्याचे लक्षात आले. कायदेशीर बाबी तपासून ॲपबाबत कारवाई केली जाईल, असे सांगितले.

भाविकांसह आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामगार विभागाचे संभाजी माळवदे यांनी देवस्थानचे काही कर्मचारी देखील यात सहभागी आहेत. हा कोट्यवधीचा घोळ असू शकतो. हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. लूट व फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा आणि भाविकांना न्याय मिळावा, याकरिता भाविकांसह आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

पोलिसांकडून चौकशी सुरू

शनिशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी अनधिकृत ॲप व त्यातील रकमेविषयी शनैश्वर देवस्थानचे पत्र मिळाले आहे. चौकशीची मागणी केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी केली जाईल, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT