
Anil Deshmukh Nagpur meeting : विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव पदरी पडल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता सातत्याने चर्चा व बैठका घेतल्या जात आहे.
जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी विधानसभानिहाय निरीक्षकांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आघाडी होवो अथवा ना हो आपण स्वबळावर निवडणुकीची तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) अनेक वर्षे मंत्रिमंडळात होते. रमेश बंग, विजय घोडमारे, प्रकाश गजभिये हे आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद दिसत होती. आता मात्र पक्षाचा एकही आमदार शिल्लक राहिला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने आता आपला सर्व फोकस जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे वळवला आहे.
महायुतीप्रमाणे (Mahayuti) या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहील की नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला देखील पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपासाठी बरोबरीची अट टाकली आहे. ती काँग्रेसचे नेते मान्य करतील की नाही, याची कोणालाच शाश्वती नाही. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकत्र लाढली होती.
झेडपी जिंकण्यासाठी आघाडी हवीच
राष्ट्रवादीचे सहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसने वाटा देण्यास राष्ट्रवादीला स्पष्ट नकार दिला होता. राष्ट्रवादीने उपाध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र तोही फेटाळून लावला होता. शेवटी बड्या नेत्यांना यात हस्तक्षेप करावा लागला होता. शेवटी एक सभापतीपद देऊन राष्ट्रवादीचे समाधान करण्यात आले होते. काँग्रेसचा अनुभव गाठीशी असल्याने राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकायची असले, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र राहणे गरजेचे आहे. असे असले तरी काँग्रेसचे नेते आजही स्वतःला मोठा भाऊ समजून राष्ट्रवादीला धाकात ठेवताना दिसत आहे.
बैठकीला कसदार नेत्यांची हजेरी
हे बघून राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश इच्छुकांना दिले आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत विदर्भ प्रभारी अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील, माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी सनदी अधिकारी व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, सलील देशमुख, कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, प्रदेश पदाधिकारी शेखर कोल्हे, जिल्हा महिला अध्यक्ष डॉ. वैशाली टालाटुले, प्रदेश महिला सरचिटणीस बबिता सोमकुंवर, युवती जिल्हाध्यक्ष रश्मी आरघोडे उपस्थित होते.
निरीक्षकांच्या नियुक्त्या
या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका,नगर पंचायत या निवडणुकांच्या दृष्टीने तालुकानिहाय बैठकांचे आयोजन, प्रत्येक गणात आणि गटात पक्ष बांधणी आणि बैठका व कार्यक्रमाची आखणी, तसेच मित्र पक्षांशी स्थानिक आणि प्रदेश पातळीवर संपर्क साधून आघाडीबाबत चर्चा करावी, असे ठरविण्यात आले. याच बैठकीत निरीक्षकांची नावे व त्यांचे मतदारसंघ जाहीर करण्यात आले. हिंगणा विधानसभा मतदासंघ रमेश बंग व विजय घोडमारे, काटोल शेखर कोल्हे व दीपक मोहिते, उमरेड प्रकाश गजभिये व विनोद हरडे, सावनेर अविनाश गोतमारे, रामटेक किशोर बेलसरे, कामठी किशोर गजभिये यांची नियुक्ती जाहीर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.