BJP Mahayuti fake order case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Mahayuti Fake Order Case : ग्रामविकास विभागाचा बनावट आदेश; दोन गुन्हे दाखल, ठेकेदार पसार, तर पोलिसांना वेगळाच संशय

Fake rural development department order filed in Maharashtra : ग्रामविकास विभागाच्या विकासकामांच्या मंजुरीचे बनावट आदेश देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची फसवणूक केल्याचे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

Pradeep Pendhare

Fake Tender Order: ग्रामविकास विभागाच्या विकासकामांच्या मंजुरीचे बनावट आदेश देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची फसवणूक केल्याचे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात या गुन्ह्याच्या स्वतंत्र नोंदी झाल्या आहेत.

दरम्यान, कोतवाली पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देण्यास चार महिने विलंब का केला, याचे स्पष्टीकरण मागणारे पत्र पाठवले आहे. या पत्रामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार देखील पोलिसांच्या 'रडार'वर आला आहे.

कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात ठेकेदार अक्षय चिर्के (रा. देऊळगाव सिद्ध, ता. नगर) याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार आहे. त्याने 4 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर उपविभाग कार्यालयास बांधकामाचा बनावट आदेश सादर केला.

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर, वाकोडी, देऊळगाव सिद्धी, कामरगाव, चास, बाबुर्डी बेंद इथल्या कामासाठी बांधकाम विभागाने स्थळपाहणी करून अंदाजपत्रके तयार करण्याची मागणी केली. विभागीय कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला.

एकूण 33 विकासकामांचे 5 कोटी 65 लाख रुपये खर्चाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. तसेच पूर्ण झालेल्या 13 पैकी 8 कामांची मोजमापे घेऊन, पुस्तकात नोंदवून विभागीय कार्यालयात 40 लाख रुपये मंजुरीसाठी देयके सादर करण्यात आली.

ही देयके ऑनलाईन प्रणालीद्वारे ग्रामविकास विभागाकडे सादर केल्यावर हा आदेश बनावट असल्याचे आणि संबंधितांवर गुन्हा (Crime) दाखल करण्याचा आदेश 4 एप्रिल 2025रोजी सार्वजनिक बांधकामच्या उपविभागास प्राप्त झाले.

भिंगार कॅम्प पोलिसांकडील तक्रार

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सार्वजनिक बांधकामामधील विद्युत उपविभागीय फसवणूक झाल्याची तक्रार आहे. कनिष्ठ अभियंता सुप्रिया कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

10 डिसेंबर 2024रोजी कार्यालयात एक अनोळखी व्यक्तीने येत ग्रामविकास विभागाचा 3 ऑक्टोबर 2024च्या आदेशाची झेराॅक्स प्रत सादर करत नगर, पारनेर तालुका आणि नगर शहरातील कामाची अंदाजपत्रके तयार करण्याची मागणी केली.

सात कामांचा बनावट आदेश

विद्युत नाशिकने कार्यकारी अभियंत्यामार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आला. एकूण सात कामे असून, कामाचा खर्च 9.90 लाख रुपये आहे. त्यानंतर देयकांची छाननी करून निधी मागणीसाठी देयके आॅनलाईन प्रणालीद्वारे ग्रामविकास विभागाकडे पाठवल्यास 3 आॅक्टोबर 2024 रोजी हा आदेश बनावट असल्याचे माहिती मिळाली. तसेच बनावट आदेशाप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा आदेश 4 एप्रिल 2025 रोजी प्राप्त झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT