Political Horoscope: मराठी-हिंदी वादावरून राजकारण तापणार

Maharashtra Politics Astrology Predictions 12 July to 18 July 2025: भविष्यनामा : राजकीय क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ होऊ शकतो. राजकीय नेत्यांवर आरोप होतील. मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाया, गुन्हे दाखल होतील.
Raj Thackeray Hindi opposition
Raj Thackeray Hindi oppositionSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

सप्ताहात रवी कर्क राशीत प्रवेश करीत आहे. या सप्ताहात रवी आणि नवपंचम योग होत आहे. या शुभ योगामुळे देशातील मोठे उत्सव उत्साहाने व शिस्तीने पार पडतील. या योगामुळे अधिवेशनात महत्त्वाचे कायदे संमत होतील, मंदिरे, जाती, धर्माविषयी मोठे निर्णय घेतले जातील.

पुढील काळात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी होईल. मात्र, या काळात जाती-धर्माविषयी अफवा पसरविल्या जातील. या विरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले जातील. विशेष करून महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वादावरून राजकारण गरम राहील. हिंसेविरोधात कारवाई होण्याची शक्यता राहील

पुढील काळात शनी-मंगळ प्रतियोग होणार आहे. या योगामुळे धार्मिक, जातीय, भाषिक वाद वाढण्याची शक्यता राहील. धार्मिक स्थळांना घातपाताची धमकी दिली जाईल. महत्त्वाच्या व्यक्ती, प्रमुख स्थळे, धार्मिक स्थळे, शहरांना या काळात धोका संभवतो. शेतकरी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असून, सरकार विरोधात बंद, निदर्शने होतील. या काळात मोठ्या किंवा प्रमुख व्यक्तींवर प्राणघातक हल्ला, अपघात, घातपात या प्रकारच्या घटना संभवतात. पुढील काळात दहशतवादी, माओवादी संघटना आक्रमक होऊन स्फोटक, हिंसक घटना घडविण्याचे प्रमाण होतील. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जाईल. उत्तर भारतात नैसर्गिक आपत्ती, विमान दुर्घटना किंवा स्फोटक घटना, दहशतवादी कारवायांचा धोका संभवतो.

Raj Thackeray Hindi opposition
Kolhapur Politics: मर्जीतल्या अधिकाऱ्यासाठी सत्ताधारी दोन आमदारांमध्ये इर्षेचा डाव सुरू

या काळात पुरेशा पावसामुळे अनेक धरणांची पातळी सरासरीएवढी वाढल्याने पाण्याची चिंता कमी होईल. शेतीसाठी उपयुक्त साठा निर्माण होईल. महिन्याच्या उत्तरार्धात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. सांगली, कोल्हापूर, देशाचा पूर्व भाग येथे मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. पूर, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान संभवते. मंगळ-केतू युती होत असल्यामुळे खेळाडू, पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांच्या निवृत्तीच्या घटना होतील. पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता राहील.

सरकार किंवा प्रमुख्य व्यक्तीविरोधात बंड होईल. मोठा पक्ष फुटण्याची शक्यता असून, पक्षांतराच्या घटना वाढतील. जुलैच्या उत्तरार्धात राजकीय क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ होऊ शकतो. राजकीय नेत्यांवर आरोप होतील. मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाया, गुन्हे दाखल होतील. खेळ, स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल.

शेजारी राष्ट्रांवर विजय मिळेल. पोलीस, लष्कराकडून मोठी कारवाई यशस्वी होईल. युद्ध-स्पर्धेमध्ये देशाला विजय मिळेल. या काळात रवी-प्लुटो प्रतियोग होत असल्यामुळे अनेक देश एकत्र येऊन मोठे निर्णय घेतले जातील. अमेरिकेच्या टॅक्स टेरीफ विरोधात महत्त्वाचे देश एकत्र येऊन बंडाच्या पवित्र्यात उभे राहतील. या काळात जागतिक पातळीवर मोठे निर्णय घेतले जातील. रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठी घोषणा होईल.

Raj Thackeray Hindi opposition
Pratap Patil Chikhlikar: सोळा निवडणुका जिंकल्या! चार दशकं राजकारणात; प्रताप पाटील चिखलीकरांचा असा आहे फिटनेस

या काळात आत्महत्या अपहरण, चोरीचे गुन्हे वाढण्याची शक्यता राहील. अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड होण्याची शक्यता असून, विमान भरकटणे, अपघात, हेलिकॉप्टर दुर्घटना यातून हानी संभवते. कलाकारांसाठी हा काळ उत्तम असून, नवीन चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळेल. कलाकारांचे सन्मान होतील.

सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता असून, सोन्या-चांदीच्या भावातील वाढ कायम राहील. या काळात मोठ्या राजकीय व्यक्ती, प्रमुख व्यक्ती, उद्योगपती, कलाकार यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात. मोठ्या व्यक्तींचा गूढ मृत्यू, आत्महत्येच्या घटना या काळात संभवतात.

साप्ताहिक राशिभविष्य १२ ते १८ जुलै २०२५

मेष : चतुर्थातील रवीचे भ्रमण घर, जागा, वाहन खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी अनुकूल राहील. सप्ताहात मित्र, सहकारी वर्गाशी समज-गैरसमज संभवतात. हितशत्रूंवर विजय मिळेल. सहली छोटे प्रवास होतील.

वृषभ : नोकरीसाठी छोटे प्रवास घडविणारा कालखंड आहे. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. तीर्थयात्रा, सहली होतील. सप्ताहात नोकरी, व्यवसायात गोंधळाची स्थिती राहील. वरिष्ठांशी समज-गैरसमज होतील.

मिथुन : सप्ताहात आर्थिक उलाढाली होतील. वारसा हक्काची कामे होतील. कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल. वरिष्ठांकडून होणारी मनमानी सहन करावी लागेल. उद्योगधंद्यांत मंदीसारखी स्थिती राहील.

कर्क : राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावेत. दूरचे प्रवास, परदेशगमनाचे बेत आखाल. गुरुजनांचा सहवास लाभेल.

सिंह : कर्जाची कामे होतील. घर, वाहन यासाठी खर्च होतील. नवीन नोकरीची संधी मिळेल. सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीतील व्यवसायाची संधी मिळेल. मानसिक स्थिती खराब राहील.

कन्या : मोठ्या व्यक्तीच्या ओळखी, गाठीभेटी होतील. सरकारी कामात यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल. भागीदारीमध्ये नुकसान संभवते.

तूळ : दशमातील रवीचे आगमन अधिकार वाढविणारे असून, नोकरीत प्रमोशन होईल. राजकीय क्षेत्रात मोठे पद मिळेल. प्रतिष्ठा, मानसन्मान वाढेल. नवीन नोकरी, व्यवसायाची संधी मिळेल. वास्तू सौख्य मिळेल.

वृश्चिक : गुरुजनांचा सहवास लाभेल. नातेवाइक, भावंडांचा सहवास लाभेल. प्रसिद्धी, पुरस्कार मिळेल. सप्ताहात घर, जागेची कामे मार्गी लागतील. वडिलोपार्जित वारसाहक्काच्या कामातून लाभ होतील.

धनू : पुढील महिन्यात मोठे प्रवास टाळावेत. पथ्यपाणी पाळावे. पैशाची कामे होतील. मोठी गुंतवणूक होईल. छोटे प्रवास, सहली होतील. घरातील वातावरण अशांत राहील. ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. मन अशांत राहील.

मकर : भागीदारीमध्ये नवीन व्यवसायाची संधी मिळेल. जोडीदाराला अधिकार मिळतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल. नोकरीत वेतनवाढ होईल. हाताखालच्या लोकांचे चांगले सहकार्य राहील. कोर्टकचेरी टाळावी.

कुंभ : षष्टातील रवीचे आगमन पुढील महिन्यात नवीन नोकरी मिळण्यासाठी अनुकूल राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. मोठे कर्ज मंजूर होईल. सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

मीन : शेअर मार्केट, म्युच्यूअल फंडामध्ये गुंतवणूक कराल. मित्र, सहकारी यांची मदत होईल. सप्ताहात मोठे खर्च होतील. दूरचे प्रवास कराल. मात्र, उत्तरार्धात शारीरिक, मानसिक स्वास्थ्य खराब राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com