Shirish Kotwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP-NCP Politics : ‘चांदवडचे शेतकरी म्हणाले, भाजपला मत ही आमची चूकच’

Sampat Devgire

Maharashtra Politics News : सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत कांदा निर्यातबंदी विरोधात चांदवड येथे झालेल्या आंदोलनात माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी नेमकेपणाने राजकीय मुद्दा मांडला.

यावेळी त्यांनी ‘भाजपला मतदान करणार नाही’ असे उपस्थित शेतकऱ्यांकडून वदवूनच घेतले. त्यामुळे हे आंदोलन एकप्रकारे आगामी निवडणुकीचा राजकीय एल्गारच ठरला. (Sharad Pawar`s agitation against Onion export banned by BJP)

चांदवड (Nashik) येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निर्यात बंदी या विषयावर केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. यावेळी काँग्रेसचे (Congress) आमदार शिरीष कोतवाल व अन्य नेत्यांनी आगामी निवडणुकीत शरद पवार देतील त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्धार केला.

या सभेत काँग्रेसचे कोतवाल यांनी भाजपला थेट लक्ष्य केले. आम्ही यापूर्वी सतत सांगत होतो. भाजपला शेतकरी कधीच आपला वाटला नाही. त्यामुळे भाजपला मत देऊन आपण चूक केली आहे. यावेळी शरद पवार स्वतः चांदवडला आले आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षी ते शेतकऱ्यांलाठी केंद्र शासनाशी लढत आहेत.

शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत. रस्त्यावर उतरले आहेत. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना संकटात लोटणाऱ्या भाजपचे आमदार आणि खासदार यांना जाब विचारला पाहिजे. त्यासाठी भाजपला धडा शिकविण्याची हीच योग्य संधी आहे, असे कोतवाल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी गेल्या निवडणुकीत आपल्या सांगितले होते. आपण त्यांचे ऐकले नाही भाजपला मतदान केले. आता हे भाजपचे आमदार, मंत्री आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी चर्चा करू, असे सांगत आहेत.

माझा प्रश्न आहे, अहो चर्चा काय करता तुम्ही मंत्री आहात, तर थेट निर्णय का घेत नाही. शरद पवार साहेब केंद्रात मंत्री होते तेव्हा निर्यात बंदीचा विषय आल्यावर त्यांनी थेट निर्यात बंदी करणार नाही असे जाहीर केले होते. भाजपचे नेते अशी हिम्मत दाखवतील का? असा प्रश्न त्यांनी केला.

माजी आमदार कोतवाल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट राजकीय भूमिका घेतली. ते म्हणाले, आंदोलनाच्या निमित्ताने आगामी निवडणुकीत आपण काय निर्णय घेणार?. आता आपण आपली चूक सुधारायची वेळ आली आहे.

शरद पवार सांगतील तसे करणार की नाही, अशी विचारणा त्यांनी शेतकऱ्यांना केली. भाजपला मतदान करणार नाही ना? असा प्रश्न विचारला. शरद पवार देतील त्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणणार ना?

अशी विचारणा करीत हात वर करून सगळ्यांनी निर्धार कला असे आवाहन केले. त्यावर उपस्थितांनी शरद पवार जिंदाबाद घोषणा देत हात उंचावले. एक प्रकारे कांदा निर्यातबंदी विरोधातील आंदोलन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची नांदीच ठरली, असे म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT