Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics : बाळासाहेब थोरातांना सरकारविरोधात मोठा मुद्दा मिळाला!

Farmers Politics, State Government should give 100% relief for Farmers-अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चांदवडला केली पाहणी

Sampat Devgire

Balasaheb Thorat on Farmers : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी केली. यावेळी चांदवड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंचनाम्यांचे निकष लावले तरीही यंदा शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना राज्य शासनाला तातडीने दिलासा द्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले. या निमित्ताने काँग्रेसला राज्य सरकारविरोधात मोठा मुद्दा मिळाला आहे. (Congress Leader Balasaheb Thorat visits lost grape farms in Chandwad)

गेल्या सप्ताहात अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची आज चांदवड भागात (Nashik) काँग्रेस नेते (Congress) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य शासनाकडून (Maharashtra Government) शंभर टक्के भरपाईची मागणी केली.

चांदवड या आवर्षणग्रस्त तालुक्यात यंदा पावसाळ्यात पाऊस नसल्याने शेतीचे नुकसान झाले. या भागातील प्रमुख कॅश क्रॉप असलेल्या द्राक्षांचे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. यामध्ये अनेक गावांत मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, पालकमंत्री, आमदार आदींनी याबाबत भेटी देऊन शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विविध घोषणा केल्या. सध्या त्यावर मोठे राजकारण सुरू झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी तसेच परिसरातील गावांत विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार व अन्य अधिकारीही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी यंदा बँकेकडून पीककर्ज घेऊन द्राक्षबागांवर जेव्हढा खर्च केला, तो सर्व वाया गेला आहे. यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता, राज्य सरकार काहीही मदत करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी केली.

यासंदर्भात श्री. थोरात यांनी सद्यस्थितीत शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करताना, त्याची नोंद घ्यावी. अहवाल तयार करताना ही वस्तुस्थिती त्यात नोंदवावी. तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मोठे संकट उभे राहीले आहे. त्यात मदतीची गरज आहे.

त्यानंतर झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चेत त्यांनी हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेस याबाबत राज्य शासनाला त्याती दखल घेण्यास भाग पाडेल. त्यासाठी आम्ही राज्यातील सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विधीमंडळात त्यावर सरकारचे लक्ष वेधू. राज्य शासनाला अवकाळीची नुकसान भरपाई द्यावीच लागेल.

यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, रमेश कहांडळ, भिमराव जेजुरे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, अरूण पगार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT