NCP MLA Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Saroj Ahire : अजितदादांनी सरोज अहिरेंना दिले मोठं गिफ्ट!

Sampat Devgire

Saroj Ahire news: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांवर निधीची बरसात केली आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांना गिफ्ट मिळाले आहे.

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची चंगळ झाली आहे. विशेषतः शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना तर लक्ष्मी भरभरून प्रसन्न झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.

यानिमित्ताने मतदारसंघातील विकास कामांचा गवगवा करण्याची संधी या आमदारांना उपलब्ध झाली आहे. बहुतांशी सत्ताधारी आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदारांची चलती आहे. अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे असल्याने अनेक आमदारांना त्याचा लाभ झाला.

यामध्ये देवळालीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पावणे तीनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आमदार अहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यावर प्रारंभी शरद पवार यांची बाजू घेतली होती. नंतर मात्र विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून त्या अजित पवार गटात सहभागी झाल्या होत्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सय्यद पिंपरी ते शिंदे गाव या रस्त्यासाठी 174 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय मतदारसंघातील शिंदे गावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 35 कोटी मंजूर झाले. गिरणारे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी 16 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

विविध कामांना यामुळे चालता मिळणार आहे. सध्या पक्षांतर केल्याने अडचणीत असलेल्या सरोज अहिरे यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक मोठा मुद्दा यानिमित्ताने मिळाला आहे.

देवळाली मतदारसंघातील विविध कामे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होती. गेल्या तीन-चार वर्षे पाठपुरावा करूनही त्याला शासनाची मंजुरी नव्हती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रखडलेले या कामांना निधी मिळावा म्हणून आमदार अहिरे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे तगादा केला होता. त्याला काही प्रमाणात यश मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT