Arun Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar BJP : भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल ; महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय काय ?

Maharashtra Politics : राजकीय आकसातून अडकवण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे आणि त्यांचे भाऊ उदय मुंडे यांच्यावर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर शेवगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मुंडे गट आक्रमक झाला होता. त्यामुळे नगरचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंच्याच जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट वाढला आहे. वाळू प्रकरणाचा आधार घेऊन राजकीय दबवातून गुन्हे दाखल होत असल्याचे आरोप होतात. दरम्यान, 21 नोव्हेंबरला अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तालुका न्याय दंडाधिकारी यांना वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच शुक्रवारी शिंगोरी येथे मोठा अवैध वाळूचा साठा तहसीलदारांनी पकडला.

दरम्यान, पिंगेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील 25 ब्रास वाळू चोरीला गेली होती. याबाबत ठेकेदार उदय मुंडे व भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्याविरुद्ध मंडल अधिकारी अय्या अण्णा फुलमाळी यांनी तक्रार दिली. तर पिंगेवाडीच्या सरपंच रंजना अशोक तानवडेंनी ग्रामपंचायातीच्या वाळू चोरीची तक्रार पोलीस व महसूल प्रशासनाकडे केली आहे. मात्र ती दाखल करण्यात येत नसल्याने सरपंच तानवडे यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावल्याचे समजते. त्यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने आता गुन्हे दाखल केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा गुन्हा राजकीय द्वेषातून झाल्याचे मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दाखल केलेले खोटे वाळूचे गुन्हे तत्काळ मागे घ्या, या मागणीसाठी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन दिले. तसेच शेवगाव पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची तात्काळ बदली करून त्यांची चौकशीचीही मागणी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शेवगाव पोलिस निरीक्षकांविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळन दौंड, माजी सभापती संभाजीराव पालवे, पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, दिलीप खेडकर आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव तालुक्यात अवैध दारू, मटका-जुगार असे अनेक अवैध धंदे सुरू असून पोलिस आणि लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला आहे. केवळ निनावी अर्जावर राजकीय अकसातून अरुण मुंडे यांचे नाव गुंतवून किरकोळ वाळू चोरीप्रकरण दाखवून राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT