Crime News
Crime News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Five Prisoners escaped From Jail : कारागृह फोडून पाच कैदी फरार.. गुजरात-महाराष्ट्र पोलिसांची धावपळ सुरू...

सरकारनामा ब्यूरो

नवापूर : येथील पोलीस ठाण्यातील कारागृहातून पाच कैदी आज (ता.५ डिसेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास फरार झाले. ही घटना कळताच पोलिस प्रशासनाची कैद्यांना पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली. पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

सदर घटनेबाबत गुजरात (Gujarat) पोलिसांना कळवून कैद्यांना पकडण्यासाठी मदत घेतली आहे. पळालेले कैदी गुजरात राज्याच्या दिशेने ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांसह स्थानिक नागरिक शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. दुपारी गुजरात पोलिसांनी एकाला पकडले असून उच्छल पोलिस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. (Crime News)

नवापूर येथील पोलीस ठाण्यातील कारागृहातून पाच कैदी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास फरार झाले. कारागृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाच्या दगडी भिंतीत असलेल्या लाकडी खिडकीला पाडुन कैदी पळून गेले. कारागृहाबाहेर २४ तास पोलीस पहारा असतो. तरीही पाच कैदी खिडकी पाडून मागच्या बाजूने फरार झाले. ज्या रस्त्याने फरार झाले तो रस्ता २४ तास रहदारीचा व वर्दळीचा आहे. सदर कैदी पळून गेले की आणखी काही वेगळा प्रकार आहे. याबाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दुपारून गुजरात राज्यातील पोलिसांनी एकाला पकडले असून उच्छल पोलिस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.

नवापूर पोलीस ठाण्यात दरोड्यातील पाच कैदी कारागृहात ठेवले होते. कारागृहाच्या दरवाज्या जवळच पोलिस पाहारा असतो, इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सतत ये-जा असते, दहा ते बारा फुटाची खोलीत काही हालचाल झाली तरी लक्ष वेधले जाईल, असे असतांना कैद्यांनी शौचालयाची खिडकी पाडून पळून जाणे आणि याबाबत कारागृहाच्या ड्यूटीवर उपस्थित जेलरला समजू नये हे सर्वसामान्य माणसाला पटणार नाही.

कारागृहाची मागील बाजू म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पोलिस ठाणे ते बजरंग चौक, शास्त्रीनगर हा चोवीस तास वर्दळीचा परीसर. या वर्दळीच्या भागातून चार ते पाच कैदी निकर, बनियनवर काही नाईटपॅन्ट वर पळून गेले. या भागात वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी सांगितले की कुठेतरी हाणामारी झाली असेल म्हणून पळत असतील. त्यामुळे कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

दरम्यान, कारागृहाची स्वच्छतागृहाची खिडकी पडल्याचा आवाज आला असेल, कैदी खिडकीतून उड्या मारून पळ काढत आहेत, हे दिसल्यावर लगेच पाठलाग केला असता तरी अवघ्या काही मिनिटांत कैदी हाताला लागले असते. मात्र तसे झालेले दिसत नाही. सगळा प्रकार संशयास्पद आहे. पळून गेलेले कैदी दरोड्यातील गुन्ह्यात अटक होती, आज गुजरात राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. कैदी पळून गेल्याने शहरात व तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर नवापूर तालुक्यात व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी (Police) कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

नवापूर पोलिस ठाण्याला पोलिस अधीक्षक,उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह जिल्हा पोलिस प्रशासनचे अधिकारी यांनी भेट देऊन स्थानिक पोलिस अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांची चांगली कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे. कैद्यांना पकडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. सोशियल मीडियावर फरार कैद्यांचे छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. गुजरात राज्यातील एका ऊसाच्या शेतात फरार कैदी लपल्याचे कळताच महाराष्ट्र व गुजरात पोलिसांनी शेताला चौफेर घेरा घातला असल्याचे वृत्त आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT