Digvijay Singh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Digvijay Singh:...आता आमदारांचीही होतेय विक्री; दिग्विजय सिंग यांचा गद्दारांवर घणाघात

Madhya Pradesh Digvijay Singh attack on Shiv Sena split: बाजारात जनावरांची खरेदी-विक्री होताना पाहिले आहे, तसे आमदारही विकले गेले, असेच चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाले," असे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग म्हणाले.

Pradeep Pendhare

काँग्रेसचे नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी महाराष्ट्रातील सत्ताबाजारावर तिखट टीका केली. शिवसेनेशी गद्दारी करून आमदार कसे विकले गेले, यावर त्यांनी निशाणा साधला.

"लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने आम्हाला चांगली साथ दिली. यापेक्षाही आगामी होणार्‍या विधानसभेला मतदारांनी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्या लोकांनी केलेल्या गद्दारीवर तिखट निशाणा साधला.

बाजारात जनावरांची खरेदी-विक्री होताना पाहिले आहे, तसे आमदारही विकले गेले, असेच चित्र राज्याच्या राजकारणात पहायला मिळाले", अशी टीका काँग्रेसचे नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग (Digvijay Singh) यांनी केली.

दिग्विजय सिंग यांनी राजकारणी कसा असावा आणि नसावा याबाबत चौफेर मत व्यक्त केले. राजकारण्यांकडे संपर्क, संवाद, समन्वय, सामंजस्य आणि सकारात्मक दृष्टीकोन ही पंचसूत्री असणे आवश्यक आहे. आजच्या सरकार काळात सीबीआय, ईडी यापासून वाचणे म्हणजे आव्हानच आहे, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

काँग्रेस नेते आमदार बाळसाहेब थोरात यांनी हा नगर जिल्हा म्हणजे अनेक गटातटाचा आहे. येथे राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, तर संघटन मजबूत लागते आणि आजचा युवक संघटनेत दिसतो परंतु तो एकटाच असतो.

आता सरकारला देखील युवकांची आठवण येऊ लागली आहे. राज्य सरकारने अनेक विविध योजनांच्या माध्यमातून मतदार युवकांना दाणे टाकण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. आपण त्यांचा डाव ओळखला पाहिजे. मतदारांनी आपली फसवणूक होत आहे का , हे पाहणे महत्वाचे आहे. तुम्हाला फसवून पुन्हा चातुवर्णाची व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांचा डाव यशस्वी होऊ देवू नका, असे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसमधील दिवंगत माजी आमदार जयंतराव ससाणे मित्र मंडळ, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटी, तुळजा फाउंडेशनतर्फे माजी आमदार जयंतराव ससाणे स्मृती पुरस्काराचे वितरण झाले. पोलिस अधिकारी द्वारका डोखे, उद्योजक भाऊसाहेब बडाख, ऋषिकेश औताडे, डॉ.तौफिक शेख, सुभाष गायकवाड, सौरभ कदम, प्रसाद देशमुख, शाम हेलकुट आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हेमंत ओगले, राजश्री ससाणे, करण ससाणे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, सुधीर नवले, तिलक डुंगरवाल, सचिन बडदे, दीपाली ससाणे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT