Dr. Sanjay Aparanti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Aparanti Devlali Constituency : खाकी वर्दीला खादीचा मोह; माजी पोलिस उपायुक्त लढवणार निवडणूक

Assembly Elections : रिटायरमेंटनंतर त्यांनी 2014 पासून म्हणजे नऊ वर्षांपासून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेत.

अनुराधा धावडे

Nashik Political News : प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर अनेक अधिकारी अलीकडच्या काळात राजकारणातही आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. अनेकजण आतापर्यंत निवडणुका लढवून मोठ्या पदावरही पोहाेचले. अशातच, मुंबईचे माजी पोलिस उपायुक्त डॉ. संजय अपरांती हेदेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची अपरांती यांनी स्वत: घोषणा केली आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून ते उमेदवारी करणार असल्याने मतदारसंघाला अनेक वर्षांनंतर सुशिक्षित स्वच्छ चेहरा मिळणार असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Powered By

- कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख

पोलिस प्रशासनात काम केलेला सेवानिवृत्त अधिकारी म्हटल्यानंतर आरामदायी जीवन मात्र मुंबईत पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असताना रोजच्या ज्या तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे निवृत्तीनंतर या ताण-तणावापासून मुक्त होण्याचा प्रयत्न असतो.

मात्र, याला अपवाद ठरले आहेत ते कर्तव्यदक्ष माजी पोलिस अधिकारी डॉ. संजय अपरांती. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करायचा ठरवले असून, निवडणुकीच्या आधी त्यांनी आराम करण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून नवी दिशा दाखवली. (Maharashtra Politics)

- देवळाली मतदारसंघ

त्यामुळे आता डॉ. संजय अपरांती हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून 2024 निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघाची सध्याची अवस्था बघता आतापर्यंत माजी मंत्री बबन घोलप, त्यानंतर त्यांचे चिरंजीव योगेश घोलप आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वयंघोषित मानस कन्या आणि अजित पवार गटात असलेल्या सरोज अहिरे यांनी मतदारसंघात नेतृत्व केले आहे. मतदारसंघात विकासकामांपेक्षा स्टंटबाजी करण्यात हातखंडा असणाऱ्या या देवळाली मतदारसंघात सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराची गरज असल्याची प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत.

कोण आहेत डॉ. संजय अपरांती ?

डॉ. संजय अपरांती हे तब्बल 23 वर्षे पोलिस विभागात क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्यदक्ष, नॉनकरप्ट आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर चार वर्षे महामहीम राज्यपाल महोदयांचा परिसहाय अर्थात एडीसी म्हणून काम बघितले. नाशिक शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी तीन वर्षे काम बघितले आहे. तसेच ग्रामीणमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अडीच वर्षे काम बघितले. नाशिकमधील या साडेपाच वर्षांच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. मुंबईमध्ये पोलिस उपायुक्त असताना त्यांनी डान्स बारबंदी हा महत्त्वाचा पोर्टफोलिओ हाताळला आहे. केवळ हाताळलाच नाही तर डान्स बारबंदीचा आदेशही सुप्रीम कोर्टातून आणला. (BJP)

रिटायरमेंटनंतर त्यांनी 2014 पासून म्हणजे नऊ वर्षांपासून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र अपरांती अॅकॅडमीही सुरू केली. या अॅकॅडमीत ते दररोज सायंकाळी दोन तास विनामूल्य मार्गदर्शन करतात. सुमारे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात स्थिरावली आहेत.

आतापर्यंत घेतलेलं शिक्षण

डॉक्टर अपरांती यांनी जे. जे. हॉस्पिटल ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस- एमडीचं शिक्षण घेतले. समाजशास्त्र विषयात त्यांनी एम.ए. केले. यात त्यांनी डिस्टिंगशन मिळवले. इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्येही त्यांनी एम. ए. केले. पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले. तिथे क्रिमिनल जस्टीस स्टडी अर्थात क्रिमोनोलॉजी विषयात एमएससीचं शिक्षण मेरिटने प्राप्त केलं. त्यानंतर एलएलबी आणि त्याहूनही महत्त्वाचे एलएलएमचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT