Karnataka Politics : कर्नाटकमध्ये विद्यमान सरकारच्या कारकिर्दीला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नेतृत्व बदलाची शक्यता काँग्रेसच्या एका गोटातून वर्तवली जात आहे. त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी जाहीर केले की ते पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहतील. त्यांनी हे स्पष्टीकरण त्यांच्या पक्ष काँग्रेसमधील एका गटाकडून केल्या जात असलेल्या दाव्यांवर दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सिद्धरामय्या यांना होस्पेट येथे पत्रकारांनी मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षांतर्गत येणाऱ्या वक्तव्यांबाबत विचारले. यावर सिद्धरामय्या म्हणाले, हे दिशाभूल करणारे विधान कुणी केले आहे ? जर कोणी फालतू बोलत असेल तर त्याला महत्व का देता. पूर्ण पाच वर्षे सरकारचे नेतृत्व करणार का असे विचारले असता ''आमच्याकडे हायकमांड आहे, ते निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
आमचे सरकार पाच वर्षे राहील... मी मुख्यमंत्री आहे, तसाच राहणार आहे." आणखी तीन उपमुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चांवर ते म्हणाले, ''कोण म्हणाले ? हे सर्व हायकमांडने ठरवले आहे. काँग्रेस (Congress) हा प्रादेशिक पक्ष नसून तो राष्ट्रीय पक्ष आहे. हायकमांडशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून मी किंवा आमदार सरकार बदलू शकत नाही. आमच्याकडे हायकमांड आहे, ते निर्णय घेईल.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षांतर्गत दावे-प्रतिदावे होत आहेत. सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्री पदाला अडीच वर्षा झाल्यानंतर डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात स्पर्धा रंगली होती.
काँग्रेसने कर्नाटकची निवडणूक बहुमताने जिंकल्यानंतर सिद्धरामय्या यांनी यावर्षी 20 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. मात्र, उपमुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षाला यश आले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.