Swabhimani Shetkari Sanghatana : मराठा आरक्षणास पाठिंबा देत खंडित केलेली 'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा उद्यापासून पुन्हा सुरू!

Raju Shetty News : ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ व्या ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होईल.
Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari SanghatanaSarkarnama
Published on
Updated on

Swabhimani Sanghatana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडित केलेली, ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा उद्या सकाळी ७ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून सुरू होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Swabhimani Shetkari Sanghatana
Eknath Shinde : ''ही इतिहासातील पहिली घटना असेल की, ...'' जरागेंनी उपोषण थांबवल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विधान!

मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे उपोषण स्थगित झाले. या उपोषणास पाठिंंबा म्हणून राजू शेट्टी यांनी २२ दिवसांची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती. त्या पदयात्रेस उद्या सकाळी राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथून सुरुवात होणार आहे.

सकाळी ६.३० वाजता राजू शेट्टी निवासस्थानापासून साखराळेकडे रवाना होणार असून, ८ वाजता कारखाना प्रशासनास निवेदन देऊन तिथून हुतात्मा कारखाना -नागठाणे - अंकलखोप - भिलवडी व वसगडे मुक्कामी असणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ व्या ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होईल.

Swabhimani Shetkari Sanghatana
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण थांबवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

३५० पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास -

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे स्थगित झालेली यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत ही यात्रा जवळपास ३५० किलोमीटर फिरून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आली होती. ती शिरोळ, इचलकरंजी, कागल, गारगोटी, भुदरगड-राधानगरी-करवीर- पन्हाळा-शाहूवाडी असा प्रवास करून शिराळा इस्लामपूर येथे पोहाेचली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com