Aurangabad to Chhatrapati Sambhajinagar Name Change Controversy : राज्यात तीन वर्षांच्या आधी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदललं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नाव झालं. यानंतर आजतागायत छत्रपती संभाजीनगर असेच नाव वापरलं जात आहे. मात्र आता या नामांतरावरून नवा वाद निर्माण झाला असून एका माजी आमदाराने यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मालेगावमधील इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी यावर विधान केलं असून 'आमच्या मनात आजही औरंगाबादच आहे. पण छत्रपती संभाजीनगर हे नाव आमच्यावर लादलं आहे, असे म्हटलं आहे. या वक्तव्यावरूच आता राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून भाजपने यावर पलटवार देखील केला आहे.
माजी आमदार शेख यांनी तीन वर्षांनंतर नामांतरावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, हे शहर औरंगाबाद आहे. जेथे वसलं तेथेचं आहे. कोठे जाणार नाही. पण सरकारने बहुमताच्या जोरावर याचे नाव बदलले. यावेळी शहरातील लोकांची इच्छा लक्षात घेतली नाही. लोकांच्या भावनांचा आदर केला नाही. जनतेचं मत विचारात घेतलं नाही.
सरकारने नाव बदलण्याबाबत सुनावणी घ्यायला हवी होती. जनमताची चाचणी घ्यायला हवी होती. मात्र या सगळ्या गोष्टी न करताच औरंगाबादचं संभाजीनगर असं नाव करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर हे नाव आमच्यावर लादण्याचं काम सरकारनं केलं. तरीही आमच्या मनात आजही औरंगाबाद हेच नाव असल्याचं वादग्रस्त विधान आसिफ शेख यांनी केलं.
या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपने यावर पलवार करत आसिफ शेख यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी आसिफ शेख यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना बहुत कुच मिटाना बाकी है असा सूचक इशारा दिला आहे.
यावेळी केणेकर यांनी, आसिफ शेख यांना माहित नाही की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. ज्यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. ये तो झांकी है, आगे बहुत कुच मिटाना बाकी है. आम्ही यांचे सगळे मनसुबे मातील गाडल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.