Malegaon Cattle Smuggling : धक्कादायक ! मालेगावचा माजी महापौरच निघाला गोवंश तस्कर, फार्महाऊसवर पोलिसांची धाड अन् अन् पर्दाफाश

Malegaon cattle smuggling Abdul Malik news : मालेगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महापालिकेतील एमआयएमचे गटनेते आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्या फार्महाउसवर छापा टाकत गोवंश तस्करीचा पर्दाफाश
Abdul Malik  cattle smuggling
Abdul Malik cattle smuggling Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon Politics : मालेगाव शहरात सुरू असलेल्या गोवंश तस्करी विरोधातील मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महापालिकेतील एमआयएमचे गटनेते आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत तब्बल अडीच लाख रुपये किमतीची गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून, माजी महापौरच या प्रकरणात संशयित आरोपी ठरल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अब्दुल मलिक यांच्या संवदगाव फाटा परिसरातील फार्म हाऊसवर धाड टाकली. तिथे दहा गोवंश जनावरे अंत्यत निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळली. पवारवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जनावरे जप्त केली. याशिवाय दरम्यान, किल्ला पोलिसांनी इस्लामाबाद भागातील त्यांच्या घराशेजारील गोदामावर छापा टाकून आणखी पाच जनावरे ताब्यात घेतली. या जनावरांची किंमत सुमारे ८५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलील धक्कादायक माहिती अशी की, या कारवाईदरम्यान अब्दुल मलिक यांनी चक्क पोलिसांना विरोध करत काही जनावरे पळवून लावण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अशोक बच्छाव, तर किल्ला पोलीस ठाण्यात अंबादास डामसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Abdul Malik  cattle smuggling
Malegaon Mahapalika : मालेगावात एमआयएम-इस्लाम नगरसेवकांमध्ये पुन्हा राडा, महापौर नसरीन शेख यांचा कडक शब्दात इशारा..

पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर संशयित अब्दुल मलिक फरार झाले आहे. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. मलिक हे महापालिकेतील एमआयएमचे गटनेते तसेच माजी महापौर असल्याने मालेगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अब्दुल मलिक हे आमदार मौलाना मुफ्ती यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे मालेगावच्या स्थानिक राजकारणातही या घटनेचे पडसाद उमटत आहे.

Abdul Malik  cattle smuggling
Shivsena News : हवेत गोळीबार प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

दरम्यान, ही जनावरे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांची खरेदी-विक्री होणार होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरील कारवाईत पोलिसांनी प्राणी संरक्षण व प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com