Malegaon Crime : धक्कादायक! अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसुती, अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा खळबळजनक प्रकार!

Malegaon Infant Trafficking Case : मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीच्या प्रकरणात येथील नामांकित डॉक्टरांसह 11 जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा, पोलीस कोठडीत रवानगी
Malegaon Infant Trafficking Case
Malegaon Infant Trafficking Casesarkarnama
Published on
Updated on

Malegaon Crime News : मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संदर्भात चार प्रतिष्ठित डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली.

महिला अत्याचार आणि गुन्हे राज्यभर चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीतून प्रतिष्ठित डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका रुग्णालयात अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली. या प्रसूती बाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांना त्याची माहिती मिळताच त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे.

Malegaon Infant Trafficking Case
Malegaon Cattle Smuggling : धक्कादायक ! मालेगावचा माजी महापौरच निघाला गोवंश तस्कर, फार्महाऊसवर पोलिसांची धाड अन् अन् पर्दाफाश

सोळा वर्षीय मुलीला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली. तिला गुपचूप रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. तत्पूर्वी तिची गर्भलिंग चाचणी देखील करण्यात आल्याचा संशय आहे. संबंधित मुलीची प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगी झाली. या प्रसूतीनंतर मुलीची आई संशयास्पदरीत्या गायब झाली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराचा सखोल तपास केला आहे. संबंधित अर्भक विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

संदर्भात सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून आरोग्य अधिकारी डॉ जितेंद्र डोलारे यांनी पोलिसात तक्रार केली आहे. डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ अनुजा शेवाळे आणि डॉ प्रीती व्यंकटराव जाधव यांचा 11 जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले. न्यायालयाने या आरोपींना येत्या 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Malegaon Infant Trafficking Case
Malegaon Mahapalika : मालेगावात एमआयएम-इस्लाम नगरसेवकांमध्ये पुन्हा राडा, महापौर नसरीन शेख यांचा कडक शब्दात इशारा..

राज्यात महिला अत्याचार आणि मुलींची संबंधित गैरप्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिष्ठित डॉक्टरांकडूनच गैरप्रकार लपविण्याचा प्रयत्न झाला. या संदर्भात पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com