Sujay Vikhe Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : कर्डिलेंची भविष्यवाणी ; पुढच्यावेळी राजळे मंत्री, मी आमदार अन् विखे खासदार असणार

Shivajirao Kardile News : पाथर्डी येथे पोलिस वसाहत आणि पोलिस ठाणे इमारतीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात शिवाजीराव कर्डिले हे खासदार विखेंबरोबर होते.

Amol Jaybhaye

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या कार्यक्रमांमध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा वावर वाढला आहे. पाथर्डी येथे पोलिस वसाहत आणि पोलिस ठाणे इमारतीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात शिवाजीराव कर्डिले हे खासदार विखेंबरोबर होते. कर्डिले यांनी तिथे केलेल्या भाषणाची चर्चा सध्या रंगली आहे. 'पोलिस वसाहतीच्या आणि पोलिस ठाणे इमारतीच्या उद्घाटनावेळी विखे हे खासदार, मी आमदार आणि मोनिकाताई तुम्ही, मंत्री असाल', अशी भविष्यवाणी कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी केली. कर्डिले यांचे हे भविष्यवाणीच्या भाषणावर सध्या पाथर्डीत चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा 2024 चाहूल लागली आहे. सत्ताधारी आमदार-खासदार यांनी विकासकामांच्या उद्घाटनावर भर दिला आहे. उद्घाटनाचे कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शनाबरोबरच अगामी राजकीय चाचपणी केली जात आहे. नगर दक्षिण मतदार संघात खासदार विखे यांनी विकासकामांतून संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 26 ऑक्टोबरला शिर्डीत आहेत. पंतप्रधानाच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमवण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठरवले आहे.

यासाठी खासदार विखे आणि माजी आमदार कर्डिले नगर दक्षिण पिंजून काढत आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. विकासकामांच्या उद्घाटनांना राजकीय संवादाचे स्वरुप आले आहे. पाथर्डी येथे पोलिस वसाहत आणि पोलिस ठाणे इमारतीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमही असाच झाला.

खासदार विखे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोण तयार आहे, कोण नाही, यापेक्षा जो उमेदवार असेल त्याला खासदार करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या (BJP) प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. यावेळी शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले भाषण चर्चेत आले. 'नगर जिल्ह्याचा विकासाला गती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 222 रस्त्याचे काम खासदार विखे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या पाठपुरव्यामुळे झाले. या इमारतीच्या उद्घाटनाला विखे खासदार, मी आमदार आणि मोनिकाताई या मंत्री असतील', असे शिवाजीराव कर्डिले म्हणाले.

अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक सुनील पाटील, पोलिस कल्याणचे अभियंता अरुण नागापुरे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, राहुल राजळे, अभय आव्हाड, माणिक खेडकर, दीपक जाजू, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, विष्णूपंत अकोलकर, रवींद्र वायकर, प्रवीण राजगुरू, महेश बोरुडे उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT