Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणावरून भुजबळांना मोठा धक्का; नाराज खंद्या समर्थकाने सोडली साथ  

Maratha Aarakshan Issue Setback To Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे.
chhagan bhujbal
chhagan bhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समाजात समावेश करण्याची आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे.

chhagan bhujbal
Maratha Reservation : नारायण राणेंनंतर आता रामदास कदम यांचाही जरांगेंच्या मागणीला विरोध; म्हणाले...

मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमचा त्याला विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये. आमचा त्याला विरोध राहील, असं छगन भुजबळ यांनी वारंवार सांगितलं. जरांगे पाटील यांनी यावरून भुजबळांना प्रत्येक सभेत टार्गेट केलं. भुजबळ यांची ही विधाने त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहेत. भुजबळांचे समर्थक मराठा पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकवल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, अशी भूमिका घेतल्याने छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.

जयदत्त होळकर हे राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस आहेत. त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाला मंत्री भुजबळ विरोध करत असल्याने मी राजीनामा दिला आहे. निफाड तालुका पूर्व ४६ गाव तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पुढे आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे, अशी प्रतिक्रिया होळकर यांनी दिली आहे.

chhagan bhujbal
Maratha Reservation : मराठा आरक्षण समितीने मागितली दोन महिन्यांची मुदतवाढ; तिढा वाढण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com