Ramdas Kadam, Manoj Jarange Patil
Ramdas Kadam, Manoj Jarange Patil Sarkarnama

Maratha Reservation : नारायण राणेंनंतर आता रामदास कदम यांचाही जरांगेंच्या मागणीला विरोध; म्हणाले...

Ramdas Kadam On Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. आता आरक्षणासाठी लढा देणाऱ्या जरांगेंच्या मागणीला विरोध वाढत आहे.
Published on

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला ओबीसी संघटनानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही विरोध केला आहे. या आधी नारायण राणेंनीही जरांगेच्या मागणीला विरोध केला होता. यामुळे मनोज जरांच्या मागणीला सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांचाही विरोध वाढू लागला आहे.

Ramdas Kadam, Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा-कुणबी वेगवेगळे, जरांगेंची मागणी चुकीची; राणेंच्या विधानाने वादाची ठिणगी

मराठा सामाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटली यांनी केली आहे. अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या लाखोंच्या सभेत केली होती. जरांगेंच्या या मागणीला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंनीही विरोध केला. ९६ कुळी मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत. मराठा समाज कुणबी जातीचे प्रमाणत्र घेणार घेणार, असं नारायण राणे म्हणाले होते.

आता शिंदे गटातील बडे नेते रामदास कदम यांनी आता नारायण राणेंची री ओढली आहे. मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत. कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही, असं रामदास कदम म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे उद्या म्हणजे २२ ऑक्टोबरला पुढील दिशा जाहीर करणार आहेत. यामुळे आता या मुद्द्यावर सर्वांचं लक्ष हे राज्य सरकारच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लागलं आहे.

जरांगेंच्या मागणीवर काय म्हणाले रामदास कदम?

सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही जरांगेंची जी माहिती आहे किंवा मागणी आहे, त्याला आपली सहमती नाही. मी या मागणीला विरोध करतो. विदर्भात कुणबी आणि मराठा एकच असतील, पण कोकणात कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी-बेटीचा व्यवहारही चालत नाही. आणि याची कल्पना जरांगेंना नाही. जरांगेचा कोकणसंदर्भातला तेवढा अभ्यास नाही, असं रामदास कदम म्हणाले. कोकणातला एकही मराठा कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही. हे मी दाव्याने सांगतो, असं रामदास कदम म्हणाले.

Ramdas Kadam, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Rally Akluj : तुमची लोकसंख्या 4 वर्षांत 60 टक्के झाली कशी? ओबीसींच्या प्रमाणावर जरांगेंचा सवाल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com