Rajiv Deshmukh .jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : शरद पवारांचा झुंजार नेता हरपला! माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Former NCP MLA Rajiv Deshmukh passes away : राजीव देशमुख यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबादारी सोपवण्यात आली होती. त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव,दांडगा जनसंपर्क, प्रशासनावरची पकड यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.

Deepak Kulkarni

Chalisgaon News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं मंगळवारी (ता.21) हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे उत्तर महाराष्ट्रातला शरद पवारांचा विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झुंजार नेता हरपला आहे.

माजी आमदार राजीव देशमुख यांची चाळीसगाव आणि जळगाव या दोन जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ म्हणून ओळख होती. त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून 2009 ते 2014 या कालावधीत प्रतिनिधित्व केलं होतं. देशमुख यांच्या अकाली निधनामुळे चाळीसगावच्या राजकारणात कधीही न भरुन येणारी मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) नेतेमंडळींची आहे.

राजीव देशमुख यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबादारी सोपवण्यात आली होती. त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव,दांडगा जनसंपर्क, प्रशासनावरची पकड यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.

चाळीसगाव (Chalisgaon) नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगलीच चर्चेत राहिली होती. विधानसभेची 2009 ची निवडणूक जिंकण्यानंतर मात्र राजीव देशमुख यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. दोन सलगच्या पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळ तशीच जपली होती.

तसेच आमदार असताना चाळीसगाव मतदारसंघातील विकासकामे आणि मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण आता राजीव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे चाळीसगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकारणापलीकडचे सर्वपक्षीय संबंध जपणारा, अभ्यासू, अनुभवी,संयमी आणि दूरदृष्टी असलेला नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गमावल्याची भावना चाळीसगावच्या राजकारणात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT