Delhi Name Controversy : भाजप सत्तेत परतताच 'दिल्ली'च्या नामांतराचा मुद्दा तापला; विश्व हिंदू परिषदेनं सांस्कृतिक मंत्र्यांना लिहिलं पत्र

BJP government Delhi name change : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप प्रणित एनडीएचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या 11 वर्षांत त्यांच्याकडून देशातील अनेक शहरांचं नामांतर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातीलही औरंगाबाद,उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची नावे आता बदलण्यात आली आहेत.
Rekha Gupta Delhi CM
Rekha Gupta Delhi CM Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप प्रणित एनडीएचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या 11 वर्षांत त्यांच्याकडून देशातील अनेक शहरांचं नामांतर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातीलही औरंगाबाद,उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची नावे आता बदलण्यात आली आहेत. आता हे जिल्हे अनुक्रमे 'छत्रपती संभाजीनगर','धाराशिव'आणि अहिल्यानगर या नव्या नावांनी ओळखले जातात.अशातच आता थेट देशाची राजधानी दिल्लीच्या (Delhi) नामांतराची मागणी समोर आली आहे.

विश्व हिंदू परिषदेने देशाची राजधानी नवी दिल्लीचे नामांतर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. याबाबत विहिंपने दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात दिल्लीला तिचा प्राचीन इतिहास व संस्कृतीशी जोडण्यासाठी तिचं नाव ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्याची मागणी विहिंपने केली आहे. या मागणीनंतर आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं (BJP) अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'च्या ताब्यातून सत्ता खेचून आणली होती. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 48 जागा जिंकत भाजपनं दणदणीत विजय मिळवला होता. 27 वर्षांनंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात आता दिल्लीच्या नामांतराच्या हालचाली वाढल्या आहेत.

विहिंपचे दिल्ली प्रांत सचिव सुरेंद्र कुमार यांनी दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना देशाच्या राजधानीच्या नामांतरासंबंधीचं पत्र लिहिलं आहे. याच पत्रात दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची मागणीही विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

Rekha Gupta Delhi CM
Bharat Gogawale : राष्ट्रवादीवर शिवसेनेचा वार! तटकरेंच्या गोटातील कट्टर नेता गोगावलेंनी फोडला

दिल्ली रेल्वे स्थानक व शाहजहानाबाद विकास बोर्डाचे नामांतर करून ते इंद्रप्रस्थ ठेवण्याची मागणी आहे. दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करावे, जेणेकरून राजधानीचे नाव प्राचीन इतिहास व संस्कृतीशी जोडले जाऊ शकेल,असे विहिंपचे दिल्ली प्रांत सचिव सुरेंद्र कुमार यांनी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषदेने रविवारी दिल्ली सरकारचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात विविध मागण्या केल्या आहेत. त्यात दिल्लीचे नाव बदलून पुन्हा इंद्रप्रस्थ करावे,जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे नाव 'इंद्रप्रस्थ रेल्वे स्थानक' असे करावे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव "इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात यावे. तसेच शाहजहानाबाद विकास मंडळाचं नाव इंद्रप्रस्थ विकास मंडळ असं करण्यात यावे अशा अनेक मागण्या उचलून धरल्या आहेत.

Rekha Gupta Delhi CM
Abdul Sattar : मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी अब्दुल सत्तार स्वबळावर मैदानात; विरोधक रोखणार का?

दिल्लीच्या वारसा पदयात्रेत किल्ले,मंदिरे आणि हिंदू राजांची स्मारके समाविष्ट असावीत,जिथे मुस्लिम आक्रमकांची स्मारके आहेत, तिथे हिंदू नायक, ऋषी आणि पांडव काळातील स्थळे देखील ओळखली पाहिजेत आणि त्यांच्या जवळ स्मारके बांधण्यात यावीत, दिल्लीत राजा हेमचंद्र विक्रमादित्य यांच्या नावाने एक भव्य स्मारक आणि मिलिटरी स्कूल यांची उभारण्यात यावीत, असंही विश्व हिंदू परिषदेनं पत्राद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com