विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा विषय बनला होता. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत सत्तेसाठी दोन्ही प्रमुख आघाड्या आपला जोर लावला होता. यात मंगेश चव्हाण हे विजयी ठरले.
२४ व्या फेरी अखेर मंगेश चव्हाण यांनी १ लाख ५२ हजार ४४२ मते मिळाली आहेत. तर उन्मेष पाटील यांना ९६ हजार १२ मते मिळाली आहेत. अजून एक फेरी बाकी आहे. चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचे सध्याचे चित्र आहे.
चाळीसगाव मतदारसंघात एकेकाळी चांगले मित्र असलेले उमेदवार आमने-सामने आले होते. भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध माजी खासदार उन्मेष पाटील हे मैदानात उतरले होते. चाळीसगावच्या लढतीला जिल्ह्यातील सर्वांत 'हायव्होल्टेज' लढत मानली गेली. मविआच्या जागावाटपात या जागेसाठी उद्धवसेना व शरद पवार गटात चांगलीच रस्सीखेच सुरु होती. शेवटी ही जागा उद्धवसेनेच्या वाट्याला गेली. लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्याचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.
चाळीसगाव विधानसभा हे भाजपसाठी एक महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. १९९० पासून, एक निवडणुक वगळता वगळता हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख हे विजयी झाले होते. २०१४ मध्ये भाजपने ही जागा परत जिंकली होती. २०१९ मध्ये देखील भाजपचे मंगेश चव्हाण विजयी झाले. मंगेश चव्हाण यांनी ८६,५१५ मते मिळवून विजय मिळवला, राजीव अनिल देशमुख यांना ८२,२२८ मते मिळाली होती. दोघांमध्ये चांगलाच सामना रंगला होता. भाजपच्या मंगेश चव्हाण यांचा विजय झाला.मतदारसंघात मुस्लिम, आणि राठोड समाजाच्या मतदारांची संख्या अधिक आहे. याशिवाय जाधव आणि पवार समाजाचे मतदारही मोठ्या संख्येने आहेत.
अमळनेर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत् झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान मंत्री अनिल पाटील मैदानात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार असल्याने या मतदारसंघात काट्याची टक्कर झाली. त्यांच्यासह 12 उमेदवार शर्यतीत होते. अनिल पाटील हे विजयी झाले आहेत. अनिल पाटील यांना 1 लाख 9 हजार ४४५ मते मिळाली असून 33 हजार 435 मतांनी विजय झाला आहे. तर शिरीष चौधरी यांना 76 हजार १० मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे अनिल शिंदे यांना 13 हजार 798 मते मिळाली आहेत.
अनिल पाटील - अमळनेर
मंगेश चव्हाण - चाळीसगाव
किशोर पाटील - पाचोरा
सुरेश भोळे - जळगाव शहर
गिरीश महाजन - जामनेर
गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण
अमोल पाटील - पारोळा
चंद्रकांत पाटील - मुक्ताईनगर
संजय सावकारे - भुसावळ
अमोल जावळे - रावेर
चंद्रकांत सोनवणे - चोपडा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.