Gram Panchayat Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election : पत्नीचा पराभव जिव्हारी लागला; माजी सरपंचांची विरोधकांना शिवीगाळ, दिवाळीही केली नाही...

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील एका माजी सरपंचाला पत्नीचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Pradeep Pendhare

Nagar News : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा खाली बसून दिवाळीचे फटाके फोडले जात आहे. विजयी झालेल्या उमेदवारांचा आनंद द्विगुणित असल्याने फटाक्यांवर फटाके फोडत आहेत. मात्र, पराभूत उमेदवारांना पराभव पचनी पडणे अवघड झाले आहे. काही जण त्यातून सावरत आहेत, काहींना सावरण्यासाठी विविध गोष्टींचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एका माजी सरपंचाच्या पत्नीचा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यातून त्याने विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना मोबाईलवरून केलेली शिवीगाळ हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. (Former sarpanch abuses opponents in Nagar)

श्रीरामपूर तालुक्यातील एका माजी सरपंचाला पत्नीचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. यातून त्याने दिवाळीदेखील केली नसल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीत मोठ्या फरकाने पत्नीचा पराभव झाला. सत्ताधारी गटाच्या उमेदवाराकडून हा पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पराभवाचा वचपा काढण्यासाठी या माजी सरपंचाने थेट विरोधी गटातील पॅनेल प्रमुख कार्यकर्त्यांना मोबाईलवरून कॉल करत शिवीगाळ केली. माजी सरपंचाकडून झालेली शिवीगाळ कार्यकर्त्यांनी ऐकली. या झालेल्या प्रकाराची कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी पॅनेल प्रमुखांकडे तक्रार केली आहे.

पॅनेल प्रमुखांनी कार्यकर्त्यांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पॅनेल प्रमुखांनी माजी सरपंचांना वेगळे कारण काढून भेटीचा निरोप दिला. भेटीला आलेल्या माजी सरपंचांची संबंधित पॅनेल प्रमुखांनी चांगलीच कानउघाडणी केली. माजी सरपंच हे उच्चशिक्षित आहेत. पॅनेल प्रमुखांनी या माजी सरपंचाच्या शिक्षणावर बोट ठेवले.

शिवीगाळ केल्याने तुमचीच जास्त बदनामी होणार आहे. विरोधकांना चर्चेला संधी मिळणार आहे, अशा शब्दांत चांगलीच कानउघाडणी केली. यावर माजी सरपंचांनी माफीनामा सादर केला. पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे आश्वासन दिले आहे, यामुळे सध्यातरी या प्रकरणावर पडदा पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT