Dispute In Mahayuti : महायुतीमध्येही बिनसलं; अजित पवार गट विकासनिधीवरून शिंदे गटावर नाराज, २१ नोव्हेंबरला बैठक

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांची येत्या २१ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ती बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Mahayuti Leaders
Mahayuti LeadersSarkarnama

Mumbai News : विकास निधीच्या वाटपावरून महायुतीमध्येही आता नाराजीनाट्य रंगले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निधीवाटपावरून नाराज असून, आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे निधी मिळत नसल्याची आमदारांची तक्रार आहे. त्यातूनच पवारांनी दिल्लीत जाऊन शाहांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. (Meeting of Ajit Pawar group MLAs on November 21)

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत जाऊन भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांची येत्या २१ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ती बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचा शिंदे गटावर आक्षेप आहे. निधीवाटपात आम्हाला डावलले जात आहे, असे राष्ट्रवादीच्या आमदारांचे म्हणणे आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahayuti Leaders
Maratha Reservation : सावंतांच्या कारखान्याकडून मिळालेली साखर रस्त्यावर ओतून केली होळी; भूम-परांड्यातील मराठा आक्रमक

विकास निधीसह विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे आपली भूमिका मांडणार आहेत. महायुतीमध्ये येताना आम्हाला देण्यात आलेल्या शब्दाप्रमाणे निधी मिळत नाही, असे राष्ट्रवादीच्या आमदारांचे दुखणे आहे. तसेच, विकासनिधीत एकसमानता नाही, असेही अजित पवार गटाचे म्हणणे आहे.

दर मंगळवारी अजित पवार गटाच्या आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक होत असते. त्याप्रमाणे येत्या २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या नाराज आमदारांची बैठक होत आहे. त्या बैठकीत विकास निधीसह विविध विषयासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार आपली भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Mahayuti Leaders
Nagar Politics : ‘मी आनंद निर्माण करण्यासाठी आलोय’; कोल्हेंच्या वक्तव्याचा अर्थ शोधण्यात गुंतले नगरमधील मातब्बर...

आश्वासित केलेला विकास निधी अजूनही आमदारांना मिळालेला नाही. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांची बदल्यांमध्येही हस्तक्षेप केला जात आहे. यासह इतर मुद्द्यांवरही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांशी चर्चा करणार आहेत. पालकमंत्र्यांच्या वाटप झालं असलं तरी डीपीसीचा निधी मिळत नसल्याची आमदारांची तक्रार आहे.

विकास निधीच्या मुद्द्यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते, तसेच शाह यांच्यासोबत दिल्लीत काय चर्चा झाली, याचीही माहिती पवार यांच्याकडून आमदारांना दिली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. २१ नोव्हेंबर) देवगिरीवर होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Mahayuti Leaders
Wankhede Meet Raut : समीर वानखेडे-संजय राऊतांची भेट विदर्भात शिवसेनेला नवा चेहरा मिळवून देणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com