Shankarrao Sirsat-Rohini khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

LPG Shortage Crisis : माजी सरपंचाचा गॅस सिलिंडरच्या रांगेत मृत्यू : रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांवर हल्लाबोल, 'वर तोंड करून बोलणाऱ्या आमदार मॅडम...'

Akola News : इराण-इस्त्राईल युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून अकोल्यात सिलिंडर रांगेत माजी सरपंचाचा मृत्यू झाला. यावरून रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

Vijaykumar Dudhale

Jalgaon, 29 March : इराण-इस्त्राईल युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना नंबर लावूनही सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंचांचा गॅस सिलिंडच्या रांगेत मृत्यू झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सिलिंडर २५ दिवसांत येईल, असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

टंचाईमुळे राज्यातील अनेक गॅस एजन्सीसमोर नागरिक रांगा लावताना दिसत आहेत. त्यानंतरही अनेकांना सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा सिलिंडरच्या रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन शनिवारी (ता. २८ मार्च) मृत्यू झाला आहे, त्यामुळे रोहिणी खडसे (Rohini Khadse ) या संतप्त झाल्या आहेत.

रोहिणी खडसे यांनी अकोल्यातील घटनेनंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी गॅस तुटवड्यावर लक्ष वेधताना विधिमंडळाच्या आवारात आंदोलन केल होते. त्यावेळी सिलिंडर बुक करा; २५ दिवसांत येईल, असे वाघ यांनी त्यांना म्हटले हेाते. त्याच मुद्यावरून खडसेंनी वाघांना टार्गेट केले आहे.

राज्यात गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना अकोल्यातील शंकरराव शिरसाट यांचा फोटो दाखवा, असेही रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे. माजी सरपंच शिरसाट यांच्या मृत्यूमुळे प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा. अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे.

सिलिंडर बुक करा, २५ दिवसांत येईल, असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी, असा टोलाही रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT