Rohini Khadse : अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू ; रोहिणी खडसे यांचा फडणवीस सरकारला इशारा

Rohini Khadse Warning Maharashtra government : इराण, इस्रायल-अमेरिका युद्धाचे चटके आता हॉटेल व्यावसायाला बसत आहेत. गॅस पुरवठ्याच्या कमतरतेमुळे हॉटेल व्यावसायच गॅस वर आला आहे.
Rohini Khadse
Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : इराण, इस्रायल-अमेरिका युद्धाचे चटके आता भारतातील हॉटेल उद्योगाला बसू लागले आहेत. आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असल्याने त्या देशांमधून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅसचा तुडवडा भासू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर एक मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याने मुंबईतील २० टक्के हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आल्याचे आहार संघटनेने सांगितले आहे. पुढील तीन दिवसात गॅस पुरवठा सुरळित न झाल्यास ५० टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते असं सांगितलं जात आहे. मुंबईसारखीच काहीशी पुण्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातही व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात तोडगा न निघाल्यास ८० टक्के हॉटेल्स बंद होतील अशी भिती तेथील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

यापार्श्वभूमीवर पुणे हॉटेल असोसिएशनने अत्यंत गंभीर इशारा दिला असून, जर येत्या दोन दिवसांत इंधन पुरवठ्यावर तोडगा निघाला नाही, तर परिणाम वाईट होतील असा इशारा त्यांनी दिला आहे. गॅस पुरवठा पुर्ववत न झाल्यास पुण्यातील हॉटेल्स दोन ते तीन दिवसांत बंद पडतील असं पुणे होटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यावरुन राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

Rohini Khadse
Nashik NMC Politics : राजकारणात शब्दाला किंमत... तो पाळण्यासाठी भाजप -शिवसेनेची धडपड, स्वीकृतसाठी नवा फॉर्म्युला ठरवला?

रोहिणी खडसे यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहे.

Rohini Khadse
Dhule Murder : पिता पुत्राचा दुहेरी खून, माजी नगराध्यक्षासह 12 जण दोषी, 11 मार्चला सुनावणार‌ शिक्षा ...

पुणे परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हवं तर केंद्राशी बोलून तोडगा काढावा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com