Bhanudas Murkute  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhanudas Murkute : माजी आमदार मुरकुटे अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, काय आहे प्रकरण...

Former MLA Bhanudas Murkute arrested in the crime of torture : श्रीरामपूरमधील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : श्रीरामपूरमधील माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना कालरात्री साडेअकरा वाजता त्यांच्या श्रीरामपूरमधील निवासस्थानातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. मांजरी (ता. राहुरी) येथील महिलेने त्यांच्याविरोधात अत्याचाराचा फिर्याद दिली आहे.

माजी आमदार मुरकुटे कामानिमित्त श्रीरामपूरबाहेर होते. मुंबईत होते. काल रात्री ते शहरात दाखल झाले. त्यानंतर राहुरी पोलिस (Police) त्यांच्या श्रीरामपूरमधील निवासस्थानी पोचले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेत अटक केली. अटकेनंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना, नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माजी आमदार मुरकुटे यांना अटक झाल्याची माहिती समोर येताच, त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सकाळी गर्दी केली होती. नगरच्या जिल्हा रुग्णालयात देखील गर्दी होती. भानुदास मुरकुटे नगर जिल्ह्यातील राजकारणात दबदबा आहे, त्यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

कोण आहेत भानुदास मुरकुटे

चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यवसायाला सुरवात केल्यानंतर राजकीय प्रवासाची सुरुवात देखील पराभवाने झाली. या राजकीय वाटचालीत तीनदा तालुक्याचे आमदार झाले. गेली 36 वर्षांपासून अशोक सहकारी साखर कारखाना संभाळत आहे. शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंट झाले. काही काळ प्राध्यापक म्हणूनही नोकरीही केली.

1978 जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवली. तिथं पराभव झाला. 1980 मध्ये काँग्रेस (आय)च्या तिकीटावर पहिली विधानसभा निवडणूक लढताना मुरकुटे यांनी 25 ते 26 हजार मतांनी विजय मिळवला. तिथपासून आतापर्यंत 36 वर्षाच्या राजकीय वाटचालीत भानुदास मुरकुटे तीनदा आमदार झाले. मध्यतंरी त्यांनी 35 सरपंचासह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. आता बीआरएस पक्षाने राज्यातून गाशा गुंडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT